Homeकोपरगावरवंदे येथे गोदावरी कृषि उत्पन्न खाजगी बाजार समितीचे महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते...

रवंदे येथे गोदावरी कृषि उत्पन्न खाजगी बाजार समितीचे महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते उदघाटन

रवंदे येथे गोदावरी कृषि उत्पन्न खाजगी बाजार समितीचे उदघाटन गोदाधामचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सोमवारी झाले याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने विवेकभैय्या कोल्हे यांनी कृषी उद्योजक शांताराम कदम,प्रविण व संदिप कदम यांचा सत्कार केला.

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

  मुक्त अर्थव्यवस्थेत स्पर्धा अनिवार्य आहे.शेतक-याचे हित जोपासूनत्याच्या शेतमालाच्या भल्यासाठी ग्रामिण भागात रवंदे वासीयांनी आघाडी घेवुन सर्वप्रथम गोदावरी महिला नागरी पतसंस्था सांगवीभुसार मार्फत गोदावरी कृषि उत्पन्न खाजगी बाजार समिती स्थापन केली ही बाब स्वागतार्ह असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. 
   तालुक्यातील सांगवीभुसार हद्दीत गोदावरी कृषि उत्पन्न खाजगी बाजार समितीचे उदघाटन गोदाधामचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सोमवारी करण्यांत आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
      प्रारंभी या बाजार समितीचे संस्थापक व माजी सरपंच शांताराम बाबुराव कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केले.प्रविण शांताराम कदम व संदिप शांताराम कदम यांनी राज्य पणन संचालक विनायक कोकरे व जिल्हा मुख्य प्रबंधक गणेश पुरी यांच्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करून शेतकरी हीतासाठी खाजगी बाजार समिती उपक्रमाची माहिती दिली. कोपरगांव तालुका सहायक निबंधक नामदेवराव ठोंबळ यांनी कार्यपध्दती सांगितली.
  श्री.विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की,शेतकरीपुत्राने वीस एकर क्षेत्रावर ही बाजार समिती स्थापन करून धाडसी पाऊल उचलले आहे,उद्योजक प्रवीण शांताराम कदम यांनी शेतीला व्यवसाय मानत त्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे याचा अभिमान आहे.माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी राज्यात सर्वप्रथम डंकेल प्रस्ताव,गॅट करार,खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण अंतर्गत आंतरराष्ट्रीय शेती व्यापार करारात येथील शेतक-याला संरक्षण कसे मिळेल यासाठी जनजागृती केली.मुक्त अर्थव्यवस्थेत स्पर्धा होते त्यातुन विकसीत विरूद्ध विकसनशील देशातील शेतकरी आणि त्यांच्यातील तफावत याचा अभ्यास करून त्याबाबत देशपातळीवर कृषि विभागाची ध्येय धोरणे काय असावी याबाबतची मांडणी केली.इंटरनॅशनल फोरम फॉर इंडियन अॅग्रीकल्चर या संस्थेमार्फत त्यांनी येथील शेतकरी व त्याच्या शेतमाल हितासाठी जाणिव पुर्वक प्रयत्न केले.ग्रामिण अर्थकारणाला संजीवनी उद्योग समुह व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची जोड देत सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले.रवंदे रहिवासीयांनी ग्रामिण भागात गोदावरी कृषि उत्पन्न खाजगी बाजार समिती स्थापन करून धाडसी पाउल उचलले आहे या पंचक्रोशीतील शेतक-यांच्या हितासाठी त्यांनी सातत्यांने काम करावे असे शेवटी सांगितले. 
     याप्रसंगी महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे,रंवदे येथील शिवशंकर उद्योग समुहाचे संस्थापक व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे माजी उपाध्यक्षसाहेबराव कदम,सरपंच भानुदास भवर,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब कदम,उपसरपंच संदिप कदम,साहेबराव लामखडे,भिमराव भूसे,ऋषीकेश कदम, बिच्चुनाना जाधव,सोपानराव कासार,राजेंद्र कासार,शरदराव गडाख,मधुसुदन मोरे,महेश कदम,कोपरगांव तालुका भाजपाचे उपाध्यक्ष डॉ राजकुमार दवंगे,प्रकाश वाघ,सुदाम गाडे यांच्यासह रवंदे,मळेगांवथडी,सांगवीभुसार,मायगांवदेवी,धामोरी पंचक्रोशीतील सर्व शेतकरी विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी,सहकारी, महिलाभगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.शेवटी शांताराम कदम यांनी आभार मानले.संजीवनी उद्योग समूहाचेवतीने महंत रामगिरी महाराज यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.



        
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!