Homeकोपरगावपालिकाहददीतील समतानगर,शिंदे शिंगीनगर व महात्माफुलेनगर येथे मद्य व्यवसायास परवाना देवु नये

पालिकाहददीतील समतानगर,शिंदे शिंगीनगर व महात्माफुलेनगर येथे मद्य व्यवसायास परवाना देवु नये

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

          शहरातील पालिका हद्दीतील समतानगर,शिंदे शिंगीनगर व महात्माफुलेनगर येथे मोठया प्रमाणांत नागरी रहिवास असुन शेजारीच चर्च कॉन्व्हेंट स्कुल असल्याने या भागात कुठल्याही मद्य व्यवसायास परवानगी देवु नये अशा आशयाचे निवेदन या भागातील रहिवासीयांनी सामुहिक रित्या मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना मंगळवारी दिले.नागरिकांचा विरोध डावलुन मद्य व्यवसायास परवाना दिल्यास त्याचे विपरीत परिणाम होतील असेही जिल्हाधिकारी व संबंधीत अधिका-यांना कळविले आहे. 
      या निवेदनांत पुढे म्हटले आहे की,पालिकाहददीतील समतानगर,शिंदे शिंगीनगर व महात्माफुलेनगर येथे मोठया प्रमाणांत नागरी वस्ती असुन महाजन गोठयाजवळ नव्याने बिअर व वाईन शॉपी सुरू करण्यांबाबतचे प्रकटन काढण्यात आले आहे त्यामुळे याभागातील रहिवासीयांना मोठया प्रमाणांत मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.या सर्व रहिवासीयांनी एकत्रीतरित्या यास सक्त विरोध दर्शवुन सुमारे अडीचशे रहिवासी मंगळवारी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना समक्ष भेटले त्यांना याबाबतची सर्व वस्तुस्थिती समजावुन सांगितली व याठिकाणी कुठल्याही मद्य व्यवसायास परवानगी देवु नये म्हणून विरोध दर्शविला आहे.सदर जागेवर मद्य व्यवसायास परवानगी दिल्यास त्यातून तरूणपिढीमध्ये व्यसनाधिनता वाढुन गोर गरीब जनतेचे संसार प्रपंच उदवस्त होणार आहे,मद्यपींचा त्रास महिला भगिनीसह शालेय विद्यार्थी विद्यार्थीनींना मोठया प्रमाणांत जाणवणार आहे.हा संपुर्ण परिसर नागरी रहिवास वस्तीचा असुन शेजारीच चर्च कॉन्व्हेंट स्कूल आहे त्यावरही विपरीत परिणाम होवुन येथील शांतता धोक्यात येवुन कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे तेंव्हा नागरिकांच्या मागणीचा प्रधान्याने विचार करून सदर ठिकाणी कुठल्याही मद्य व्यवसायास परवाना देण्यांत येवु नये असेही या निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर समतानगर,शिंदे शिंगीनगर, महात्माफुलेनगर परिसरातील रहिवासी यांच्या असंख्य स्वाक्ष-या आहेत.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!