Homeकोपरगावमंदिरात जाण्याची गरजच नाही ; महात्मा बसवेश्वरांनी मंदिरातला देवच आमच्या गळ्यात आणून...

मंदिरात जाण्याची गरजच नाही ; महात्मा बसवेश्वरांनी मंदिरातला देवच आमच्या गळ्यात आणून ठेवला आणि तुमचा आत्मा म्हणजेच परमेश्वर आहे- मा.श्री. काकासाहेब कोयटे

मुख्य संपादक – राजेंद्र तासकर
स्वराज्य वार्ता न्युज

   महाराष्ट्र हि साधुसंतांची भूमी आहे अशा या भूमीमध्ये देवी देवतांसह ज्या-ज्या थोर पुरूषानी,राजे,महाराजे,संत,महंत, महात्मे यांनी आपले अवतार कार्य पूर्ण केले व जनसामान्यांच्या मनात अजरामर राहिले अशा या विभुतींना आजही जग विसरलेले नाही त्यांपैकीच एक महात्मा बसवेश्वर महाराज आहेत.
     तालुक्यातील कुंभारी येथे  राघवेश्वर पतसंस्था व वीरशैव लिंगायत समाज बांधव व समस्त ग्रामस्थांच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८९२वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. 
       प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे मा.श्री. काकासाहेब कोयटे,पससंस्था फेडरेशनचे अध्यक्ष यांच्या हस्ते  महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करुन पुजन व आरती करण्यात आली.
       तद्नंतर कु.सायली निळकंठ व आरव निळकंठ यांनी उपस्थितांना महात्मा बसवेश्वराबद्दल माहिती सांगितली तसेच नगर येथे गायन स्पर्धा परीक्षेमध्ये कु.सायली निळकंठ हिने व्दितीय क्रमांक मिळविल्याबद्दल काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.तद्नंतर काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
      अध्यक्षस्थानावरून बोलतांना काकासाहेब कोयटे यांनी सांगितले कि,मंदिरात जाण्याची गरज नाही महात्मा बसवेश्वर महाराज यांनी १२ व्या शतकात सर्वसामान्यांना मंदिराचे दरवाजे खुले करण्याऐवजी,मंदिरातला देवच आमच्या गळ्यात आणून ठेवला आहे आणि तुमचा आत्मा म्हणजेच परमेश्वर आहे अशी शिकवण महात्मा बसवेश्वर महाराज यांनी दिली असल्याचे सांगितले.
    पुढे बोलतांना श्री.कोयटे म्हणाले की,महात्मा बसवेश्वरांनी १२ व्या शतकात जगभरात लोकशाही प्रणाली आणलीअसल्याचा उल्लेख पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या शपथविधी सोहळ्याच्या वेळी केला असल्याचे सांगितले.त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन मोठया उत्साहात साजरी केल्याबद्दल आभार मानले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.तद्नंतर वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
           यावेळी प्रमुख पाहुणे काकासाहेब कोयटे,महंत राघवेश्वरानंदगीरीजी महाराज,कोपरगाव पोलीस स्टेशनचे गवसणे पोलीस,प्रदीप साखरे,राजूरकर,गिरीश सोनेकर यांसह विविध संस्थांचे आजी-माजी अधिकारी,पदाधिकारी,संचालक तसेच लिंगायत समाजबांधव,महिला व ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक अतुल निळकंठ सर यांनी केले तर सुत्रसंचालन व शेवटी आभार वात्मिक निळकंठ सर यांनी मानले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!