

मुख्य संपादक / राजेंद्र तासकर
स्वराज्य वार्ता न्युज (9657855271)
माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार दिव्यांग क्रांती संघटने राज्याध्यक्ष बापुराव काणे साहेब यांच्या विनंती नुसार दिव्यांग बांधवांच्या तपासणी शिबिरासाठी अहमदनगर जिल्हा चिकित्सक मा.डॉ.संजयजी घोगरे साहेब यांच्याकडे मागणी केली होती.त्यानुसार अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले कि,जिल्ह्यातील 14 तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबीर अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे 28 एप्रिल पासून प्रत्येक शुक्रवारी तालुकानिहाय तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे आयोजन करण्यात आले आहे.अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबीर होत असते परंतु जिल्ह्माचा विस्तार मोठा असल्याने व दिव्यांगांची संख्या भरपूर असल्याने दिव्यांगाची हेळसांड होऊ नये म्हणून तालुकानिहाय खालीलप्रमाणे अतिरिक्त तपासणी दिनांक 28/4/2023 रोजी श्रीगोंदा व पारनेर;12/5/2023 रोजी राहता व कोपरगाव;19/5/2023 रोजी पाथर्डी व श्रीरामपूर ;26/5/2023 रोजी राहुरी व नगर तालुका 2/6/2023 रोजी अकोले व संगमनेर;9/6/2023 रोजी नेवासा व शेवगाव ; तसेच 16/6/2023 जामखेड व कर्जत तालुक्यातील दिव्यांग तपासणी होणार आहे,तरी ज्या दिव्यांग बांधवांचे नवीन दिव्यांग प्रमाणपत्र काढणे बाकी आहे किंवा ज्यांना नवीन युनिक आयडी कार्ड मिळाले नाही अशा दिव्यांगांनी वरील तारखेप्रमाणे सकाळी 9 ते 12 या वेळेत अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा.
जातांना प्रत्येकाने सोबत ओरीजनल आधार कार्ड, रेशन कार्ड,जुने प्रमाणपत्र,दोन पासपोर्ट फोटो घेऊन दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे साहेब,उत्तर अ नगरचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे साहेब,जिल्हा समन्वय आप्पासाहेब ढोकणे पाटील,महिला जिल्हाध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख,जिल्हा सचिव हमीदभाई शेख,जिल्हा उत्तर अहमदनगर संपर्कप्रमुख नितीन चौधरी,जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, जिल्हा समन्वयक राजेंद्र पोकळे,जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पोपटराव शेळके व सर्व तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष यांनी आपल्या तालुक्यातील दिव्यांग बांधवांची युनिक आयडी कार्ड व प्रमाणपत्र तपासणी कामी माहीती द्यावी व दिव्यांग बांधवांना या तपासणी शिबीराचा लाभ मिळवून द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.