Homeकोपरगावमहावितरणच्या आडमुठे कारभारामुळे वापरायच्या पाण्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐैरणीवर

महावितरणच्या आडमुठे कारभारामुळे वापरायच्या पाण्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐैरणीवर

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

        महावितरणच्या आडमुठे कारभारामुळे तालुक्यातील कुंभारी गावठाण हद्दीतील असलेला ट्रान्सफार्म गेल्या तीन दिवसापासून जळालेला असल्याने धुणे -भांडी,वापरायच्या पाण्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली आहे.
        महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून विचारले असता कार्यालयातील अधिकाऱ्यांना सुट्टी असल्याचे कारण सांगून जबाबदारी झटकून मोकळे होतात,अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे नागरीकांना होणाऱ्या मनस्तापास जबाबदार कोण ? 
     महावितरणने वेळेवर ११केव्हीए सह एलटी लाईनवर असलेले मेंटनन्स सह झाडांची ट्रि कटींग केल्यास संभाव्य होणारे दोष टळतात,त्याचबरोबर लाईन सुरळीत होते,दुर्घटना टळतात व लाईनची गळती कमी होण्यास मदत होते,परंतु गावातील एलटी लाईनवरील ट्री कटींगकडे दुर्लक्ष केले गेल्यामुळेच ट्रान्सफार्म जळाला कि काय असेही बोलले जात आहे.त्याचबरोबर बॉक्समध्ये असलेले कटाऊट खराब झाल्याने बुशिंग गरम होऊन फुटले कि काय अशी शंका वर्तवली जात आहे.
       शासनाच्या ध्येय धोरणानुसार गेल्या पंधरा वर्षापूर्वी महावितरण कंपनीने गावठाण हद्दीतील राहणाऱ्या व छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना लोड शेडिंग किंवा इतर कारणास्तव त्रास होऊ नये यासाठी गावठाण सप्रेशन करण्यात आले आहे.तसेच गावठाण हद्दीतील ट्रान्सफार्म जळाल्यास किंवा काही तांत्रिक बिघाड झाल्यास तात्काळ दुरुस्ती करून वेळेत लाईन सुरळीत करण्याचे आदेश उर्जा मंत्र्यांनी त्यावेळीदिलेले असतांना सुद्धा दोन -दोन, तीन -तीन दिवस उलटून जातात तरी अधिकारी त्याचा गांभीर्याने विचार करत नाही,असाच प्रकार कुंभारी येथील गावठाणचा ट्रान्सफार्म जळाल्याने नागरीकांना वापरायच्या पाण्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या मनस्तापास जबाबदार कोण ?अस सवाल कुंभारी ग्रामस्थ करत आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!