
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव सब जेल मधील सांड पाण्याचे तळे साचले असून या शासकीय तळ्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
विविध गुन्ह्यात कैदी असले तरी त्यांना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून देणे शासनाची जबाबदारी आहे. कोपरगाव तहसील कार्यलया शेजारी सब जेल ची जुनी इमारत आहे या ठिकाणी कोपरगाव शहर,तालुका,शिर्डी,राहता आणि लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील कैदी ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे या जेल मध्ये पाच सहा बराकी असून क्षमते पेक्षा जास्त कैदी या बराकी मध्ये आहे

या बराकी मध्येच कैद्यांच्या अंघोळ व बाथरूमच्या व्यवस्था असतात मात्र या ठिकाणी असलेल्या सांड पाण्याच्या पाईप लाईन फुटल्यामुळे जेल च्या पूर्वेकडे असलेल्या भिंती लगत मोठे सांड पाण्याचे तळे साचले असून या ठिकाणी शहरातील डुकरे,कुत्रे मुक्त पणे संचार करत असतात तसेच या सांड पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर डास तयार झाले आहे तसेच तहसील कार्यालयाच्या पूर्व बाजूला अनेक नास्ता देणारी हॉटेल आहेत मात्र या साचलेल्या तळ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण झाली असून तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिक व कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
एका बाजूला तहसील कार्यालय शासनाच्या आरोग्य विषयक योजना व स्वच्छतेच्या जाहिराती लावते मात्र दस्तुर खुद्द तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या सब जेल जवळ सांड पाण्याचे तळे निर्माण झाले असून सब जेल प्रशासनाने या शासकीय तळ्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.