Homeकोपरगावगोदावरी नदीकाठी श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूने नदीपात्रापर्यंत जास्त पायऱ्या असलेला नवीन...

गोदावरी नदीकाठी श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूने नदीपात्रापर्यंत जास्त पायऱ्या असलेला नवीन घाट नगरपालिकेने बांधावा – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

    कोपरगाव शहराच्या लगत वाहत असणाऱ्या गोदावरी नदी किनारी असलेले राष्ट्रसंत सदगुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या नावाने असणाऱ्या मौनगिरी सेतू च्या डाव्या बाजूला गावात जाताना,श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूने,लगत खूप लांब असा व त्याला नदीपात्राच्या आतपर्यंत पायऱ्या असलेला नवीन घाट नगरपालिकेने बांधावा असे माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी भाविकांच्या वतीने सुचविले आहे.
       पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा गोदावरी नदीला नवीन पाणी येते त्यावेळी शहरातील महिला,माता - भगिनी मोठ्या प्रमाणात गोदावरी मातेची व पहिल्या पाण्याची पूजा करायला येतात,आंघोळ करायला येतात,कोणी नुसते दर्शन घेऊन पायावर पाणी घेतात यांच्यासाठी
   त्याचप्रमाणे गणपती विसर्जनाच्या वेळी लोकांना गणपती विसर्जनासाठी जागा कमी पडते,कारण नदीला पूर असतो आणि कधी खूप खोल पाणी कमी असते.भाविकांची गणपती बाप्पाला विसर्जनाच्या भावना या नदीच्या वाहत्या पाण्यात बाप्पाचे विसर्जन झालं पाहिजे असे प्रत्येक नागरिकाची व गणपती बाप्पाच्या भक्ताची बालगोपालांची इच्छा असते.
    शहरात नदीकिनारी स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला मोठ्या प्रमाणात सुंदर असा घाट होईल अशी जागा आहे.त्यामुळे जनतेच्या धार्मिक भावनांचा विचार करून तसेच पौर्णिमा, अमावस्या,प्रदोष,श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची त्या ठिकाणी आंघोळीसाठी गर्दी होत असते तसेच शिर्डीलाही जाताना कोपरगाव मधून कावडी भरून लोक पायी साईबाबांना जातात.
        यासाठी नगरपालिकेने स्वामी समर्थ मदिराचे गुरू माऊली यांची परवानगी घेऊन तात्काळ सुंदर असा पक्का घाट व त्याला सुरक्षित असे संरक्षण कठडे खालपर्यंत करावेत बांधावेत,जेणेकरून काही अनर्थ घडणार नाही अशा स्वरूपाचे करता येते,ते करावे,त्याचे नियोजन करून तात्काळ हे काम चालू करावे अशी विनंती भक्तांच्या व शहरातील नागरीकांच्या वतीने नगरपालिकेला माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केली आहे.
      कोपरगाव शहराला ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेला आहे.कोपरगावच्या बेट भागात भगवान शुक्राचार्य व कचेश्वर भगवान यांचे सुंदर हेमाडपंथी मंदिर आहे.कचेश्वर मंदिरात त्र्यंबकेश्वर प्रमाणेच सर्व धार्मिक विधी वर्षभर होऊ शकतात असे मानण्यात येते,असे सांगण्यात येते.इतके महत्त्व या स्थानाला आहे.विधी केल्यानंतर बराच वेळा नदीमध्ये स्नान करावे लागते.विधीवत पूजा झाल्यानंतर स्नानासाठी योग्य अशी जागा नसल्याने ही विधीची परंपरा लोप पावत चाललेली आहे. तरी आपला हा सांस्कृतिक वसा व वारसा टिकवण्यासाठी व पुन्हा इथे पूजाअर्चा सुरू होण्यासाठी नदीच्या विरुद्ध बाजूने शुक्राचार्य घाट करण्यात आलेला आहे,त्याहून चांगला मोठा सुरक्षित घाट होणे खूप महत्त्वाचा आहे.
       यामुळेही कोपरगाव शहरांमध्ये यातील ऐतिहासिक मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी व नदीत अंघोळ करण्यासाठी,पूजा करण्यासाठी लोकांची वरदळ वाढेल व छोट्या छोट्या व्यवसायिकांना,पुरोहितांनाही याचा उपयोग होईल.
        कुंभारी आश्रमाचे मठाधिपती श्रीश्री१०८ महंत प.पू.राघवेश्वरानंदगिरी जी महाराज यांनीही कुंभारी येथे नदीकाठी छानसा घाट बांधलेला आहे.बाबांची ही इच्छा आहे की नदीकाठी स्वामी समर्थ मंदिरालगत खेटून सुंदर असा घाट व्हावा अशी राघवेश्वरानंद गिरी जी महाराजांनी इच्छा व्यक्त केली आहे,तरी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिथे मंदिराला भेट देऊन तिथल्या घाटाची पाहणी करावी व कोपरगावकरांसाठी लवकरात लवकर हा काँक्रीटचा आरसीसी घाट बांधून व त्यावर दगडी पायऱ्या करून करावा अशी श्री.पाटील यांनी नगरपालिकेला विनंती केली आहे.
       माता अहिल्याबाई होळकर यांनी ज्याप्रमाणे संपूर्ण भारतातील प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या नदीकाठी भाविकांसाठी त्याकाळी मोठमोठे सुंदर असे दगडी घाट बांधले आहेत.याचा आदर्श नगरपालिकेने घ्यावा असे शेवटी माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात शेवटी म्हटले आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!