Homeकोपरगावगौतम बुद्ध जयंतीनिमित्ताने गोरगरिबांसाठी कोपरगाव शहरातील नगरपालिकेची जुनी सायन्स शाळा अद्यावत करण्याचा...

गौतम बुद्ध जयंतीनिमित्ताने गोरगरिबांसाठी कोपरगाव शहरातील नगरपालिकेची जुनी सायन्स शाळा अद्यावत करण्याचा पाठपुरवठा करणार – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

          संविधान चौक टिळक नगर फाउंडेशनच्या वतीने भगवान गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी भदंत कश्यप लुंम्बिनी विहार यांच्या हस्ते गौतम बुद्धांची व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना मंगेश पाटील म्हणाले कि,भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे देश चालत आहे.कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात टिळक नगर,संजयनगर, सुभाषनगर,गांधीनगर,105,खडकी लक्ष्मीनगर, नदीकाठचा भाग,बैल बाजार रोड अशा बऱ्याच ठिकाणी गोरगरीब व हातावरची जनता,माता -भगिनी राहात आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत गोरगरीब तळागाळातील लोकांची मुले शिकत नाही तोपर्यंत त्यांच्या आई-वडिलांच्या मनात खंत राहिल कि,आपली मुले मोठे झाले पाहिजे,त्यांना चांगल्या घरात राहता आले पाहिजे,त्यांना चांगले जीवन उपभोक्ता आले पाहिजे,खऱ्या जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे यासाठी मुलांना शिकविल्या शिवाय पर्याय नाही म्हणूनच नेहमी वंचितांसाठी व गोरगरिबांसाठी झटत असणारे या संविधान चौक फाउंडेशनचे अध्यक्ष नितीनभाऊ शिंदे व त्यांचे सहकारी करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले.तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले शुगर केन ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष परांग संधान, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगरसेविका सौ.वर्षाताई शिंगाडे, बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिभुवन या सर्वांनी एकत्र येऊन नगरपालिकेची शाळा,कोपरगाव नगरपालिकेमार्फत प्रयत्न करून,जर सर्व सोयी -सुविधा युक्त अद्यावत अशी जर केली,तर निश्चितपणे कोपरगाव शहरातील गोरगरीब माता-भगिनी यांची मुले येथे चांगल्या प्रकारे शिक्षण घेतील व मोठे होतील,हेच आज तथागत बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आम्ही यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली व इच्छा माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी व्यक्त केली.

 या फाउंडेशनतर्फे गोरगरीब मुलांना शाळेसाठी वह्या,पुस्तक,पेन पाटी तसेच ड्रेसचेही वाटप करण्यात येते.ह्या फाउंडेशनने काही मुलेही दत्तक घेतली आहे,जी अत्यंत गरीब आहे,परंतु त्यांना शिकण्याची इच्छा आहे,अशा मुलांना दत्तक घेऊन त्यांची शिक्षणाची सोय ते करत आहेत.अशा या फाउंडेशनचे परोपकारी अध्यक्ष नितीनभाऊ शिंदे व त्यांचे सहकारी या सर्वांचे माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी या स्तुत्य अश्या उपक्रमाचे व सदस्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार बिपिन गायकवाड यांनी केले. त्याचबरोबर व्यासपीठावर बौद्धाचार्य नानासाहेब जगताप,ॲड.अजित झोडगे,साहेबराव कोपरे,मार्केट कमिटीचे सचिव नानासाहेब रणशुर, जितेंद्र साळवे,मेजर मारुती कोपरे, माजी.नगरसेवक संजय कांबळे, शिवाजी चाबुकस्वार,अशोक कोपरे, सागर कोपरे,सचिन शिंदे,विशाल शिंदे ,पप्पू बागुल,बाला पवार,जीवन वाघमारे,गोरख इंगळे तसेच रेखाताई चाबूकस्वार, लक्ष्मीबाई वाघमारे, भारतीताई शिंदे त्यांच्यासह अनेक मान्यवर व महिला, माता -भगिनी, बाळ- गोपाळ,मुली मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

व्यासपीठावरील मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले व या फाउंडेशनच्या चांगल्या कामासाठी मागे उभे राहुन पाठबळ देण्याची ग्वाही दिली.यानंतर सर्व उपस्थितानी व त्या परिसरातील लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतला व संविधान फाउंडेशनचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!