Homeकोपरगावश्री गणेश कारखाना निवडणुकीची कोल्हे थोरात गटाची विराट सभेने सांगता

श्री गणेश कारखाना निवडणुकीची कोल्हे थोरात गटाची विराट सभेने सांगता

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत उच्चांकी गर्दीने श्री गणेश सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीची प्रचार सांगता सभा पुणतांबा येथे काल पार पडली.

या प्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की,प्रवरा वाले आमच्याकडे बिघडवायला येतात मी तुमच्याकडे घडवायला आलो आहे. निळवंडेचे काम कोणी केले आणि तुमच्या भागात पाणी यावं ही तळमळ माझी किती होती याचे शेकडो साक्षीदार आहेत पण शिल्पकार म्हणून पाट्या दुसरेच लावत आहेत.आमच्या संस्था आणि कारखाने सुरळीत असताना आम्ही गणेश कारखाना निवडणुकीत आलो याचे कारण आम्हाला तुमचे गतवैभव परत द्यायचे आहे.हुकूमशाही कारभार आणि अधिकाराचे हनन करण्याची विखे यांची वृत्ती आहे पण आमच्याकडे विरोधक देखील माझा आदरच करतात आणि लोक हक्काने प्रश्न घेऊन भांडून काम करून घेतात इतके मोकळे वातावरण आहे पण तुमच्याकडे दडपशाही होती तिचे झाकण गणेशच्या निमित्ताने उडणार आहे आणि तुम्हाला तुमचे अधिकार हक्क मिळणार आहे.आमची जबाबदारी पाठिंबा देऊन ताकद देण्याची आहे तुम्ही सभासद बांधवांनी ही निवडणूक हातात घेतली आहे त्यातून विजय घडणार आहे असा मला विश्वास आहे असे श्री.थोरात म्हणाले.

युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी मनोगत व्यक्त करतांना आपल्या अनोख्या शैलीत श्रोत्यांची मने जिंकली.स्व.कोल्हे साहेबांची छबी आपल्यात दिसते असे अनेक जण प्रचारा दरम्यान अनुभव आले त्यांना सर्वांना माझा हाच विश्वास आहे की या निडणुकीसाठी मी तुमच्या न्याय हक्कासाठी आलो आहे.आमची थोरात कोल्हे युती ही अमृत संजीवनी आहे जी गणेशला देऊन उर्जित करू हा विश्वास ठेवावा. पुणतांबा हा क्रांतीची भूमी आहे इथे अनेक देशव्यापी आंदोलन सुरू झाली अशा क्रांतीच्या भूमीत होणारी सांगता सभा ही श्री गणेश निवडणुकीत होणारी विजयाची क्रांती करणारी नांदी आहे.सर्व सभांचे उच्चांक या सभेने मोडले.अगदी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यापासून दबाव आणला गेला पण स्व.शंकरराव कोल्हे यांचा नातू आहे छातीठोक पने गणेशच गतवैभव परत मिळण्यासाठी प्रयत्न करणार.मला संजीवनीचे चेअरमन होण्यापूर्वी संचालक म्हणून स्व.कोल्हे साहेबांनी कारभार अभ्यास करण्याची जबाबदारी दिली त्यामुळे गणेश कारखाना कितीही अडचणीत असेल तरीही मी व बाळासाहेब थोरात आपल्याला अपेक्षित कार्य करू असे विवेकभैय्या कोल्हे म्हणाले.

प्रभावती ताई घोगरे यांनी विखे यांच्यावर घणातात करतांना तुमची अरेरावी आम्हाला मान्य असे म्हणत उपरोधिक टोला लगावला व गणेश कारखाना ताब्यात घेताना तुम्हाला तो वस्तुस्थिती माहीत नव्हती का ? आज टीका करून सरंजामशाही करणे बंद करा तोटा कमी का करता आला नाही.? प्रवरेचा कारभार म्हणजे संचालक घरचे घरगडी असल्या सारखी वागणूक दिली जाते ही तर यांची वस्तुस्थिती असा घणाघात घोगरे यांनी केला.

अरुण कडू यांनी प्रवरा कारखाना कसा अडचणीत आहे आणि गैरकारभार आहे याचा लेखाजोखा मांडला.विखे यांच्या कारभारावर ताशेरे ओढत कडू यांनी सभेला संबोधित केले.

या वेळी मंचावर उमेदवार,विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते, सभासद,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!