Homeकोपरगावप्राचीन परंपरेनुसार लाभलेला योगासनांचा वारसा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणुन २१ जून सर्वत्र...

प्राचीन परंपरेनुसार लाभलेला योगासनांचा वारसा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणुन २१ जून सर्वत्र साजरा करावा -डॉ. अशोक गावित्रे

मुख्य संपादक राजेंद्र तासकर

प्राचीन परंपरे नुसार लाभलेला योगासनांचा वारसा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा प्रत्येक वर्षी २१ जून ला साजरा केला जातो. दि.२१ मे २०१५ साली प्रथमतःआंतरराष्ट्रीय स्तरावर योगा दिवस साजरा करण्यास तेव्हा प्रारंभ झाला,जेव्हा मा.पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी एका सभेमध्ये योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला.त्यावेळी मा.नरेंद्रजी मोदी असे म्हणाले होते की,योग ही आपल्या प्राचीन परंपरेकडून प्राप्त झालेला एक अनमोल वारसा आहे,योग केल्यामुळे आपण नेहमी निरोगी राहतो,योगा केल्याने आपले विचार,कृती,भावना यांच्यावर आपण नियंत्रण प्राप्त करु शकतो आणि आपल्या रोजच्या जीवन शैलित बदल घडवून चेतना निर्माण करुन हवामानातील कुठल्याही बदलास सहजपणे सामोरे जावू शकतो, मा.नरेंद्र जी मोदी यांच्या ह्याच प्रस्तावास २०१४ मध्ये ११डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एकूण १९३ पैकी १७५ देशांनी होकार दिला.

२१जून हा वर्षभरातील एक सगळ्यात मोठा दिवस असतो,या दिवसी सूर्य लवकर उगवतो व उशिरा मावळतो.वैदिक गणितात असे दिले आहे की उन्ह!लि संक्रांति नंतर सूर्याचे दक्षिणायन सुरू होत असते आणि हा काळ आध्यात्मिक सिद्धि प्राप्त करण्यासाठी एक उत्तम काळ मानला जातो, नियमित योगा केल्यामुळे शरीर निरोगी व तंदुरुस्त होते,शरीराची प्रतिकार क्षमता वाढते,शरीराची उर्जा वाढून आपण कुठलही काम अधिक क्षमतेने करू शकतो.शरीर लठ होत नाही,शुगर,बी पी,पचन संस्था संबंधी कुठलेही आजार होत नाही,मन शांत राहते,एकाग्रता वाढते.जागतिक योग दिना निमित विशिष्ट रूपरेखा आखण्यात येते,रूपरेखा समजून घेवून त्यामागील उद्देश्य दरवर्षी जाणून घेतला जातो व वर्षभर त्याचे पालन करण्यात येते.

२०१७आरोग्यासाठी (yoga for Heath),२०१८ शांततेसाठी योग ( yoga for peace),२०१९ हृदयासाठी योग (yoga for Heart), २०२०कौटुंबिक योग(yoga for Home and family),२०२१ कल्याणकारी योग ( yoga for well being),२०२२मानवतेसाठी योग (yoga for Huminity) साजरा करण्यात आला.योगासने,योगजीवन, योगदृष्टि,योगसाधना अशा विविध संकल्पना पूर्वीपासुन प्रचलित आहे.

आध्यात्मिक क्षेत्रात विशेष प्रगती करावयाची असल्यास योग दृष्टिचा आचार व विचार अवलंबला जातो, योग म्हणजे एकात्मता,एकता अशा विविध संकल्पना योगविषयी सांगण्यात येतील,सर्व जीवश्रुष्टी ही एकमेकांशी जोडली गेलेली असून त्याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे योग, मानवी जीवनाची अत्यंत उच्च स्थिती योग दृष्टीने प्राप्त होवू शकते.भारतात योग ज्ञान प्राचीन काळापासून उपलब्ध आहे,योगामध्ये यम,नियम, प्रत्यहार, ध्यान,आसन,भक्ति अशा अनेक बाबी समाविष्ट आहेत.योग हा वैदिक साहित्याचा भाग आहे,जो पाच हजार वर्षापूर्वी महर्षी पतंजलि द्वारा संपादित करण्यात आला, हे एक आध्यात्मिक व शारिरिक शास्र आहे, साधारणपणे योगासन व प्राणायाम पर्यंत योगाचा अर्थ लोकाना समजतो पण योगाचे अनेक प्रकार आहे. त्यामध्ये हटयोग शतकर्म,आसन, मुद्रा, प्राणायाम,प्रत्याहार,ध्यान आणि समाधी हे हटयोगाचे सात अंग आहे, याद्वारे कुंडलिनी शक्ति आणि चक्रे जागृत होतात,हटयोग ही मनाला जगाकडे जाण्यापासुन रोखून अंतर्मुख करण्याची एक प्राचीन भारतातील प्रथा आहे.रोजयोग यालाच राजश्री योग म्हणतात,त्याचे आठ भाग मानले जातात ही आठ अंगे म्हणजे यम, नियम,आसन,प्राणायाम,ध्यान,धारण, समाधी हि आठ अंगे असल्यामुळे त्याला अष्टांगयोग देखील म्हणतात इतर योग साधने पेक्षा यामध्ये अधिक शिस्त आहे.कर्मयोग कर्मयोग म्हणजे निस्वार्थी कृती यामध्ये मनावतेला शरण जावे लागतेअशा स्थितीत मनाची अलिप्तता करुन कार्य केले जाते.भगवत गीतेत कर्मयोगाचे महत्व सांगितले आहे.भक्तियोग यामध्ये भक्तिमार्गचे वर्णन केले आहे, याद्वारे प्रत्येकामध्ये देव पहाणे,त्याचा भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग सांगितला आहे श्रवण, कीर्तन,स्मरण, पदसेवा,अर्चना,वंदन,दास्य,सख्या आणि आत्मनिवेदन हे नऊ भाग आहे. द्यान योग या योगामुळे मनातील नकारात्मक उर्जा मुक्त होते यामध्ये ग्रंथ यांच्या अभ्यासतून बुद्धिचा विकास होतो या योगाची तीन तत्व आहेत आत्मसाक्षात्कार,अहंकार दूर करणे. योगसनाची अनेक प्रकार आहेत भुजंगासन,शलभासन,अनुरासन, नोवकासन,द्विपादासन,उत्तानासन, सर्वांगासन,मत्यायन,हलासन, पवनमुक्तासन,शवासन,पद्मासन, धनुरासन, वक्रासन,वज्रासन,वृक्षासन, वीरासन,त्रिकोणासन,शीर्षासन आदी या सर्वांमुळे शरीर व मन निरोगी राहण्यास मदत होते.

आपल्या व्यक्तिमत्वाचे प्रतीबिंब आपल्या चेहऱ्यावर दिसत असते,आपल्या शरीरावर सगळ्यात जास्त मसल्स हे आपल्या चेहऱ्यावर असतात व तो सुंदर दिसावा यासाठी फेसयोग आहे म्हंणजे चेहरच्या स्नायु चा व्य!याम होय,चेहरा सुंदर दिसावा अस प्रत्येकाला वाटत असते पण यासाठी फेस योगा आहे हेच बऱ्याच लोकाना माहित नाही यासाठी डॉ.अशोक गावित्रे( सौंदर्य शास्र तज्ञ) यांनी ब्यूटीफुल फेस ऑफ इंडियन हे मिशन सुरु केले असून याचा उद्देश हा प्रत्येकानी सुंदर दिसाव व यासाठी फेस योगाचा प्रचार व प्रसार करणे हा आहे यावर त्यांनी अतिशय सोप्या भाषेत समजेल असे पुस्तक देखील काढले असून लवकरच त्याचे प्रकाशन योगगुरु रामदेव बाबा यांच्या हस्ते करणार असल्याची माहीती डॉ.अशोक गावित्रे (Tricology and cosmetologist) यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!