
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
२८ नोव्हेंबरला नगरपालिकेने कॅनलचे काम करावयाचे असल्याने पाटबंधारे विभागाकडून पाणी उशिरा मिळणार असल्याचे पत्र आल्याचे सांगून, नगरपालिकेने आठवड्यातून एक दिवस शहराचा पाणीपुरवठा केला आहे. कॅनॉलला पाणी चालू असून नगरपालिकेने शहराला आठवड्यातून एक दिवस होणारा पाणीपुरवठा हा पूर्ववत चार दिवसाआड तात्काळ चालू करावा असे नगरपालिकेला दिलेल्या पत्रकात माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी म्हटले आहे.

श्री.पाटिल पुढे म्हणाले कि,गेल्या सात महिन्यापासून आठवड्यातून एक दिवस पाणी येत आहे.डिसेंबर, जानेवारी,फेब्रुवारी,मार्च,एप्रिल,मे आणि आता जून महिना संपत आला आहे.कॅनल दुरुस्तीचे काम हे केव्हाच झाले असून सुद्धा पूर्ववत किमान चार दिवसाआड पाणी पूरवठा सुरू का ? केला नाही असाही सवाल केला आहे.

पाटबंधारे विभागाने पिण्यासाठी सध्या कॅनल सोडलेला आहे, तरी नगरपालिकेने कॅनल सुरू झाल्यानंतर व कॅनल बंद होत असताना नगरपालिकेचा मंजूर पाणी कोठा हा शिल्लक राहतो तो लक्ष देऊन भरून घ्यावे व नागरिकांना या त्रासा पासून दिलासा द्यावा असेही सुतोवात केले आहे.
नगरपालिकेने आठवडयातुन एक दिवस पाणी देत असताना देखील गेल्या दोन महिन्यापासून खूप खराब,दुर्गंधीयुक्त गाळ मिश्रित असणारे अस्वच्छ पाणी नागरिकांना नगरपालिका देत आहे.खरे तर फिल्टरेशन प्लांटच्या दुरुस्तीचे काम झालेले आहे असे असताना देखील नगरपालिका स्वच्छ पाणी नागरिकांना का ? देऊ शकत नाही याचा विचार जनतेने करायला हवा असेही श्री. पाटिल यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे येवला नगरपालिकेने तळे भरल्याने पाण्याचे दिवस कमी केले. श्रीरामपूर शहराला व संगमनेर शहराला आजही रोज पाणी मिळते, रहाता शिर्डीलाही अडचण नाही.तरी नगरपालिका प्रशासनाने साठवण तळ्याकडे भरताना विशेष लक्ष द्यावे व फिल्टरेशन प्लांट कडे लक्ष दिले तर निश्चित चांगले पाणी जनतेला देता येईल.गेल्या सहा-सात महिन्यांपासून जे कॅनॉलचे दुरुस्ती कामाच्या नावाखाली शहराला होणारा पाणीपुरवठा आठवड्यातून एकदा केला होता,तो तात्काळ थांबवावा व नगरपालिकेने चार दिवसाआड प्रमाणे पुर्ववत करून स्वच्छ पाणी नागरिकांना देण्यासाठी लक्ष द्यावे आणि पावसाळा अगदी आता तोंडावर आहे .पाण्याची धरण साठ्यात मुबलकता वाढणार आहे .त्यामुळे उन्हाळ्यात लग्नसराईमध्ये मुलांच्या सुट्टीच्या काळात नगरपालिकांनी अस्वच्छ व आठवड्यातून एकदा पाणी दिले, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास व मनस्ताप सहन करायला लावला विशेष करून महिला भगिनींचे खूप हाल या काळात झाले.तरी पाणी पुरवठा ४ दिवसाआड पूर्ववत करावा अशी कळकळीची विनंती माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी जनतेच्या वतीने प्रशासनाला केली आहे.