Homeकोपरगावकोपरगाव नगरपालिकेने खुले नाट्यगृहाचे काम त्वरीत चालू करावे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

कोपरगाव नगरपालिकेने खुले नाट्यगृहाचे काम त्वरीत चालू करावे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा करावा ;अन्यथा…. ?- फकिरा भाऊ चंदनशिव

मुख्य संपादक राजेंद्र तासकर

कोपरगाव : कोपरगाव शहरातील साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणा देत मातंग समाजाच्या वतीने लहुजी क्रांती सेना जिल्हाध्यक्ष फकिराभाऊ चंदनशिव यांच्या मार्गदनाखाली,साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा करण्यात यावा त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे काम त्वरीत चालू करावे,येत्या आठ दिवसात खुले नाटयगृहाचे काम चालू करण्यात आले नाही तर आठ दिवसानंतर सर्व मातंग समाज बांधव तीव्र स्वरूपाचे उपोषण,आंदोलन करणार असल्याचे निवेदन नगरपालिकेस दि.२४ ऑगष्ट २०२३ रोजी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनाच्या वतीने देण्यात आले.

सत्यशोधक लहुजी क्रांती सेना उत्तर जिल्हाध्यक्ष फकिराभाऊ चंदनशिव यांनी नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गेली बारा वर्षे पासुन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुर्णाकृती पुतळा तयार होऊन कोपरगावात येत नव्हता,आता कोपरगाव शहरात पुतळा येऊन दिड वर्षे झाले तरी अनावरण सोहळा होत नाही.या मागचे कारण अद्याप मातंग समाजाला समजतं नाही.त्याचप्रमाणे गेली २ वर्षापूर्वी खुले नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाव देण्यात आले आहे.त्या नाट्यगृहाच्या डागडुजी व नुतनीकरणासाठी १ कोटीचे काम संबधीत ठेकेदारास देण्यात आले होते,परंतु सदर काम चालू करून अधर्वट अवस्थेत बंद केले आहे. यामुळे कोपरगांव तालुक्यातील नाट्यप्रेमी व समाजामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे.यामुळे आम्ही संघटनेच्या व समाजाच्या वतीने आपणास ८ दिवसाचे अल्टीमेटम देत आहोत.जर येत्या८ दिवसात काम सुरू केले नाही तर आम्ही ८ दिवसा नंतर उपोषण करून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत.तरी कृपया याची आपण दखल घ्यावी अन्यथा होणाऱ्या नुकसानीस नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील.असे नगरपालिकेस देण्यात आलेल्या निवेदनात शेवटी त्यांनी म्हटले आहे.

यावेळी उत्तर जिल्हाध्यक्ष फकिराभाऊ चंदनशिव,अनिलभाऊ जाधव,दौलत शिरसाट,मच्छिंद्र शिरसाठ, राहुल गायकवाड,किरण गायकवाड,दिनेश भालेराव,लक्ष्मण आवारे,साई आवारे, अल्तमश आत्तार,विकास खैरनार, संदीप गायकवाड,सचिन खडसे,रवींद्र शेलार,अनिल पगारे,दीपक पगारे यांसह आदि मातंग समाज बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!