
संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कुलच्या इयत्ता आठवी व नववी मध्ये शिक्षण घेवुन विद्यालयात प्रथम येणा-या संवत्सर,रामपुरवाडी, वाकडी परिसरातील दहा मुला मुलींना प्रत्येकी एक हजार रूपये याप्रमाणे वीस हजार रुपये शिष्यवृत्तीचे उल्हास ट्रस्ट मुंबई यांच्यावतीने पांडुरंगशास्त्री शिंदे,शरद शिंदे,सचिन उगले,मुख्याध्यापक आर एस मोरे आदींच्या हस्ते वाटप करण्यात आले.
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : गुणवंत विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी मुंबई उल्हासनगर येथील उल्हास ट्रस्ट गेल्या २४ वर्षापासून विद्यालयात प्रथम येणा-या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत म्हणून शिष्यवृत्तीचे वाटप करते हे कार्य सर्व समाजासाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व सामाजिक कार्यकर्ते पाडुरंगशास्त्री शिंदे यांनी केले.
तालुक्यातील संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कुलच्या इयत्ता आठवी व नववी मध्ये शिक्षण घेवुन विद्यालयात प्रथम येणा-या संवत्सर,रामपुरवाडी, वाकडी परिसरातील दहा मुला मुलींना प्रत्येकी एक हजार रूपये याप्रमाणे २० हजार रुपये शिष्यवृत्ती धनादेशाचे वितरण शनिवारी करण्यांत आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी उल्हास ट्रस्ट (मुंबई) चे विश्वस्थ अध्यक्ष शरद शिंदे यांनी प्रास्तविकात उपक्रमाची माहिती दिली.मुख्याध्यापक आर.एस.मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून विद्यालयाच्यावतीने उल्हास ट्रस्ट पदाधिकारी यांचा सत्कार केला.
श्री.पांडुरंगशास्त्री शिंदे पुढे म्हणाले की,ग्रामिण भागात गुणवंत विद्यार्थ्या समोर शिक्षण घेतांना अनंत अडचणी असतात.दातृत्वाच्या भावनेतुन उल्हास ट्रस्ट गेल्या २४ वर्षापासून शिष्यवृत्ती देवुन त्या दूर करण्याचा प्रयत्न करून वंचित व गुणवंत घटकांच्या जीवनात आनंद निर्माण करत आहे.त्यांच्या शिष्यवृत्ती रक्कमेचा विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी निश्चितच हातभार लागत आहे.
याप्रसंगी सर्वश्री.सचिन उगले,अभियंते ज्ञानेश्वर शिंदे,गोविंद परजणे, पर्यवेक्षक एस.आर.अंबिलवादे,आर.व्ही.दाणे,एस.के.वाघमारे,बी.एम.शिंदे, एस.एन.बनसोडे,सी.के.दवंगे,श्रीमती टावरे, गणेश आंबरे,एन.एस.तायडे, बी.के. बागुल यांच्यासह शिष्यवृत्तीधारक श्रेयस आचारी,आयेशा तांबोळी, पायल फटांगरे,चंद्रमा देवरे,तेजल जाधव,आदित्य शिंदे आदि उपस्थित होते. सुत्रसंचलन गुरुकुल प्रमुख जे.व्ही.खेताडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक आर.एस.मोरे यांनी मानले.