
ओगदी ते पढेगांव व करंजी फाटा ते पढेगांव कॅनॉल रस्ता दर्जोन्नतीकरण कामाचे भूमिपूजन भूमिपूजन प्रसंगी आ.आशुतोष काळे व मान्यवर
आ.आशुतोष काळेंनी दुचाकीवर केली रस्त्याची पाहणी
करंजी फाटा ते पढेगांवकॅनॉल रस्त्यांवर सर्वत्र मोठमोठ्या खड्यांचे साम्राज्य पसरले असल्यामुळे हा रस्ता आहे की खड्यांचा अड्डा असा हा रस्ता होता.तरीदेखील नाईलाजास्तव शाळकरी विद्यार्थी,शेतकरी व चाकरमान्यांना पर्याय नसल्यामुळे जीव मुठीत धरून सर्वजण आजवर प्रवास करीत होते.हेलखावे खाणारी लालपरी किंवा चारचाकी खड्डे चुकवता,चुकवता कधी अपघातग्रस्त होईल त्याचा भरवसा नव्हता.त्यामुळे साहजिकच यारस्त्याने ये-जा टाळली जावून कासली,शिरसगाव,तिळवणी या गावातील नागरिकांचा कोपरगाव शहराशी संपर्क तोडून आपला मोर्चा वैजापूर बाजारपेठेकडे वळविल्यामुळे कोपरगावचे ग्राहक कमी झाले होते. आ.आशुतोष काळे यांनी स्वत: दुचाकीवरून या रस्त्याची पाहणी केली असता या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम दिलेल्या ठेकेदाराने थातूर-मातुर मोजून तीनच खड्डे बुजविल्याचे नागरिकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी तात्काळ या ठेकेदाराचे खड्डे बुजविण्याचे काम रद्द करण्याच्या सूचना दिल्या.त्यांच्या या निर्णयाने नागरिक देखील सुखावले.
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव :-चार वर्षापूर्वी रस्त्यांची अवस्था काय होती हे मतदारसंघातील जनतेने पाहिले आहे अनुभवले आहे. करंजी फाटा ते पढेगांव कॅनॉल रस्ता खड्यात हरवल्यामुळे कासली, शिरसगाव,तिळवणी या गावातील नागरिकांचा कोपरगाव शहराशी संपर्क तुटला होता.अशी परिस्थिती अनेक रस्त्यांची झाली असल्यामुळे रस्त्यांचा विकास झाल्याशिवाय मतदार संघाचा विकास होणे शक्य नव्हते.त्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून मतदार संघातील रस्ते व पुलांसाठी तब्बल ४६५ कोटी निधी दिल्यामुळे मतदार संघाच्या विकासात रस्त्यांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

कोपरगाव मतदारसंघातील मौजे ओगदी ते पढेगांव रस्ता रु.४कोटी ७२ लक्ष निधीतून व करंजी फाटा ते पढेगांव कॅनॉल रस्ता रू.२कोटी ५० लक्ष निधीतून दर्जोन्नतीकरण करणेच्या कामाचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, गाव,शहर किंवा मतदार संघाच्या विकासात रस्ते महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात.मतदार संघाच्या रस्त्यांची अवस्था पाहता रस्त्यांच्या दर्जोन्नतीला प्राधान्य दिल्यामुळे मागील चार वर्षात गावापासून मुख्य रस्त्यांपर्यंत व मुख्य रस्त्यांपासून शहरापर्यंतच्या रस्त्यांचे प्रश्न सुटले आहेत त्यामुळे मतदार संघाचे दळणवळण वाढले आहे.पूर्व भागातील अनेक रस्त्यांसाठी निधी दिला आहे.पढेगाव,कासली,शिरसगाव,तिळवणी, उक्कडगाव,शिंगणापूर,ओगदी,कारंजी,पढेगाव,बोलकी,आदी गावातील नागरिकांना होत असलेल्या रस्त्यांच्या अडचणीची दखल घेवून महत्वाच्या असणाऱ्या मौजे ओगदी ते पढेगांव व करंजी फाटा ते पढेगांव कॅनॉल रस्त्यांसाठी सव्वा सात कोटी निधी दिला आहे.त्यामुळे मागील अनेक वर्षापासूनचा या रस्त्यांचा प्रश्न कायमचा सुटणार असून कासली,शिरसगाव, तिळवणी,उक्कडगाव आदी गावातील नागरिकांचा कोपरगाव शहराशी पुन्हा संपर्क जोडला जाऊन कोपरगावच्या बाजार पेठेची आर्थिक उलाढाल वाढणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कारभारी आगवण,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीपराव बोरनारे,श्रावण आसने,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे,संचालक राजेंद्र निकोले, रामदास केकाण,जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे संचालक संजय संवत्सरकर, कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब बारहाते,विठ्ठलराव आसने,संजय आगवण,चांगदेव आगवण,सांडूभाई पठाण,सरपंच बाबासाहेब शिंदे, कासलीचे सरपंच बाळासाहेब आहेर,तिळवणीचे सरपंच गोविंद पगारे, अनिल महाले,अंबादास शिंदे,आबासाहेब बोळीज,मधुकर चव्हाण,जालिंदर संवत्सरकर,विजय कदम,गणेश दाणे,प्रविण चौधरी,चंपालाल घागरे,कचरु शिंदे,लक्ष्मण बोनगे,दिलीपराव दाणे,रविंद्र बोरनारे,बाळासाहेब सोनवणे, भास्करराव शहाणे,कैलास संवत्सरकर,नितीन संवत्सरकर,कैलास कुऱ्हे, विलास परजणे,अनिल कुऱ्हे,चांगदेव काळे,लक्ष्मण निरगुडे,गोपाल कुलकर्णी,संभाजी लंके,आबासाहेब वाणी,किरण शिंदे,मनोज शिंदे, नानासाहेब मापारी,बाबुराव चव्हाण,हिरामण गुंजाळ,महेश शिंदे,अशोक शिंदे,निवृत्ती शिंदे,शंकरराव पठाडे,विठ्ठलराव शिंदे,बापूराव साळवे, अण्णासाहेब शिंदे,मुनिर शेख,परमेश्वर मापारी,अशोक म्हस्के,संपत सरटे, दत्तात्रय उसरे,भाऊसाहेब फाफाळे,नामदेव भिंगारे,नारायण जाधव, अखिलेश भोकरे,किरण ढवळे,चंद्रकांत चरमळ,सुभाष चरमळ,सोमनाथ जोरवर,संजय वाणी,गणेश गोणटे,मोहन वर्पे,गणेश मापारी,नारायण पगारे, गणेश पगारे,काशीनाथ मापारी,राहुल कदम,गणेश मापारी,सुदाम कदम, अनील शिंदे,संतोष शिंदे,कचरु कोळपे,प्रकाश मलिक,भास्कर सुंभे, बाजीराव चरमळ,मनोज शिंदे,संतोष शिंदे,नामदेव भिंगारे,कचरु शिंदे,किरण ढवळे,चंद्रकांत चरमळ,संतोष आगवण,अनिल चरमळ,निवृत्ती पगारे,डॉ. कृष्णा मलिक,दिलीप पवार,बाजीराव चरमळ,भाऊसाहेब कंकराळे, भाऊसाहेब आगवण,लक्ष्मण शिंदे,चांगदेव कोळ,रतन दाणे,अशोक शिंदे, रामेश्वर गोणटे,अनिल चरमळ,संतुभाऊ वाणी,केशव चरमळ,केशव चरमळ, रामदास आहेर,नवनाथ निकम,रमेश पोटे,हिरामण गुंजाळ,काकासाहेब निकम,मनसुब निकम,सोमनाथ निकम,गुलाबराव पटेल,भानुदास संवत्सरकर,प्रभाकर संवत्सरकर,अतुल संवत्सरकर,बाबासाहेब संवत्सरकर,दर्शन परजणे,सागर शेलार,संदीप सोनवणे,महेश चौधरी,रमेश रांधवणे,विनोद परदेशी,धोंडीराम त्रिभुवन,माऊली शिंदे,बंटी गिते,गणेश उंडे, सुरेश संवत्सरकर,संतोष गायकवाड,किरण घुले,चेतन संवत्सरकर,भिकन रहाणे,रामभाऊ नवगिरे,राजेंद्र साळवे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गौरव सोनवणे,ठेकेदार ए.आर.सोनवणे,विजय वाघ,वैभव घुले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.