Homeकोपरगावयुवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांची माणुसकी; जखमी युवकाला स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात नेले

युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांची माणुसकी; जखमी युवकाला स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात नेले

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी माणुसकी धर्म जपत‌ एका अपघातग्रस्त जखमी युवकास तातडीने स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पोहोचवून त्याचे प्राण वाचवले. विवेकभैय्या कोल्हे हे अक्षरशः देवदूतासारखे‌‌ त्या जखमी तरुणाच्या मदतीला धावून आल्याने त्याला जीवदान मिळाले. या घटनेतून विवेकभैय्या कोल्हे यांनी संकटात सापडलेल्या माणसाला मदत करून माणुसकीचे दर्शन तर घडवलेच;पण लोकप्रतिनिधींनी कसे वागावे याचे आदर्श उदाहरण समाजासमोर उभे केले आहे.

युवा नेते विवेकभैय्या कोल्हे बुधवारी (१३ डिसेंबर) रात्री आपल्या गाडीतून जात होते.त्यावेळी कोपरगाव तालुक्यातील धामोरी‌ फाटा येथील साईबाबा मंदिरासमोर एक तरुण जखमी अवस्थेत पडला असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी क्षणाचाही विचार न करता स्वतःगाडीतून उतरून त्या तरुणाकडे धाव घेतली.सदर तरुण मदतीच्या प्रतीक्षेत बराच वेळापासून रस्त्यावर पडलेला होता.या रस्त्यावरून अनेक वाहने जात होती;परंतु कोणीही त्या तरुणाच्या मदतीसाठी थांबत नव्हते.अशा वेळी विवेकभैय्या कोल्हे यांनी ताबडतोब रुग्णवाहिकेला पाचारण‌ केले.एवढ्यावरच न थांबता त्यांनी प्रसंगावधान राखून ताबडतोब आपल्या गाडीतून त्या जखमी तरुणाला उपचारासाठी चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.सदर जखमी युवकाला विवेकभैय्या कोल्हे यांनी तात्काळ स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचा जीव वाचला. त्यानंतर विवेकभैय्या कोल्हे यांनी स्वतःचासनळी‌ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन त्या

जखमी युवकाची भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली.तसेच आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना सदर युवकावर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या.विवेकभैय्या कोल्हे हे नेहमीच अडचणीत व संकटात सापडलेल्या नागरिकांना तत्परतेने मदत करत असतात.यापूर्वी त्यांनी अनेक अपघातग्रस्त नागरिकांना स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पोहोचवून त्यांचे प्राण वाचवले आहेत.बुधवारी पुन्हा एकदा त्यांनी धामोरी‌ फाटा येथे अपघातात जखमी होऊन रस्त्यावर पडलेल्या तरुणाला त्वरित आपल्या गाडीतून रुग्णालयात पोहोचवून त्याचे प्राण वाचवले आहेत.यातून त्यांनी मानवता धर्म व माणुसकीजोपासलीच‌; पण कोल्हे कुटुंबीय मतदार संघातील जनतेच्या मदतीसाठी किती तत्पर आहे आणि नागरिकांना संकटाच्या वेळी सर्वतोपरी मदत करण्यासाठी नेहमीच पुढे असते हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.याबद्दल विवेकभैय्या कोल्हे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!