
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : श्री संत जगद्गुरू जनार्दन स्वामी(मौनगिरी)महाराज समाधीस्थान व श्री काशी विश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्ट बेट कोपरगाव येथे ३४.वी पुण्यतिथी उत्सव निमित्त भव्य जपानुष्ठान सोहळा व गुरुचरित्र पारायण सोहळा दिनांक- १७/१२/२०२३ ते २४/१२/२०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. सदर उत्सव साजरा करण्याबाबत मठाधिपती प.पु.स्वामी रमेशगिरीजी महाराज व विश्वस्त मंडळाने संपूर्ण तयारी केलेली आहे.
सदर कार्यक्रमासाठी प.पु.श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधी मंदिर,महादेव मंदिर आणि नर्मदा माता मंदिर व परिसरात लायटिंग डेकोरेशन,मंडप डेकोरेशन तसेच भक्त निवास परिसरात लायटिंग डेकोरेशन,मंडप डेकोरेशनचे काम केलेले आहे.अनुष्ठान कालावधीत प पु स्वामी रमेशगीरीजी महाराज आणि शिवभक्त भाऊ पाटील यांचे दररोज संत्सग व प्रवचन होतील आणि इतर दिवशी प पु स्वामी मधुगीरीजी महाराज,प पु दिनेशगीरीजी महाराज यांचे प्रवंचन,हभप भानुदास वैरागी व रामेश्वर बैरागी यांचे भारुड होईल,प पु महामंडलेश्वर शिवगीरीजी महाराज यांचे प्रवंचन,महामंडलेश्वर काशिकानंदगीरीजी महाराज यांचे किर्तन,ह.भ. प.गोविद महाराज गोरे आळंदी,यांचे किर्तन प पु स्वामी माधवगीरीजी महाराज नाशिक यांचे प्रवचन होईल.
पुण्यतिथी उत्सव दि.१७/१२/२०२३ ते २४/१२/२०२३ कालावधी मध्ये हभप भास्करगिरीजी महाराज,हभप रामगीरीजी महाराज,हभप.रघुनाथजी महाराज,हभप.उद्धवजी महाराज,हभ प.अरुणगीरीजी महाराज,हभप. राजेंद्रगीरीजी महाराज,हभप.पांडुरंग महाराज,हभप.निवृत्ती महाराज,हभप. बाळकृष्ण महाराज पेंडेफळकर यांची सदिच्छा भेट व आशीर्वाद मिळणार आहे.
दि.२४/१२/२०२३ रोजी पुण्यतिथी उत्सवाचे दिवशी पहाटे ५.०० वाजता समाधी महापूजा होईल,५.३० वाजता नित्यनियमविधी व ६.५० आरती पूजन सकाळी ८.०० वाजता प.पु. बाबाजींच्या पादुकाची पाद्य पूजा भक्त निवास मध्ये होईल तसेच १०.०० वाजता प्रमुख साधूसंतांची प्रवचने होतील व तदनंतर १२.०० वाजता भाविकांचे मदतीने गावा गावातून आलेल्या भाकरी व आश्रमात बनवलेली ४०००० लिटर्स आमटी महाप्रसाद वाटप होईल वरील सर्व कार्यक्रम प.पु.स्वामी रमेशगिरिजी महाराज, प.पु. स्वामी मधुगिरीजी महाराज,प.पु.स्वामी माधवगिरिजी महाराज,प.पु.स्वामी दत्तगिरिजी महाराज व भाऊपाटील त्र्यंबकेश्वर याचे प्रमुख उपस्थितीत होईल अशी माहिती ट्रस्ट चे अध्यक्ष श्री दत्तात्रय बाळकृष्ण होळकर यांनी दिली.
या प्रसंगी ट्रस्ट चे उपाध्यक्ष विलासराव यादवराव कोते,सचिव अंबादास दादा अंत्रे,विश्वस्त त्र्यंबक कृष्णाजी पाटील,रामकृष्ण बंडूजी कोकाटे, अनिल बाप्पासाहेब जाधव,संदीप मोहनराव चव्हाण,आशुतोष विलासराव पानगव्हाणे,अतुल बाबुराव शिंदे, शिवनाथ सुभाषराव शिंदे सर्व विश्वस्त यांच्या उपस्थितीत होणार आहे.तरी सर्व भावीक- भक्तगणांनी मोठया संख्येने या जपानुष्ठान सोहळ्यामध्ये उपस्थित राहुन पारायण,जप,संत्संग, किर्तन,प्रवचन,भारूडाचा व दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.