Homeकोपरगावराष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त बिपीनदादा कोल्हे यांनी घेतले दर्शन

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त बिपीनदादा कोल्हे यांनी घेतले दर्शन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : राष्ट्रसंत सद्गगुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रम कोपरगाव येथे आयोजित भव्य जपानुष्ठाण व गुरुचरित्र पारायण सोहळ्याला संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी उपस्थित राहून संत,महंतांचे आशिर्वाद (रविवार २४ डिसेंबर २०२३ रोजी) घेतले.

परमपूज्य श्री रमेशगिरीजी महाराज, परमपूज्य श्री शिवगिरीजी महाराज, परमपूज्य उंडे महाराज,परमपूज्य श्री कैलासगिरीजी महाराज,परमपूज्य श्री श्रवणगिरीजी महाराज,परमपूज्य माताजी शारदानंदगिरीजी महाराज, परमपूज्य लखनगिरीजी महाराज,परमपूज्य श्री दत्तगिरीजी महाराज, परमपूज्य भोलेगिरिजी महाराज,परमपूज्य विमलगिरीजी महाराज, परमपूज्य श्री माधवगिरीजी महाराज,परमपूज्य श्री संतोषगिरीजी महाराज, परमपूज्य श्री संदीपगिरीजी महाराज,नितीनदादा कोल्हे,आ.आशुतोष काळे,मा.खा.भाऊसाहेब वाकचौरे,श्री जनार्दन स्वामी आश्रमाचे अध्यक्ष दत्तात्रयजी होळकर,शरदनाना थोरात,अरुणदादा येवले,वसंत थोरात, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज ट्रस्टचे विश्वस्त व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन भूमीत चैतन्य आहे.अध्यात्मिक आणि संस्कारशिल ऊर्जा या पवित्रस्थळी नतमस्तक होउन मिळते.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमातून भाविक आदर्श जीवन जगण्याचे अनुयायी होतात.महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या गुरूउपदेशाने बाबाजींची अध्यात्मिक शिकवण,प्रसादरूपाने मिळणारे मौल्यवान आशीर्वाद हे अलौकिक ठेवा आहेत अशी भावना बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!