Homeकोपरगावआ.आशुतोष काळेंच्या विकास कामांचा साधू-संताकडून देखील गौरव ;सत्कार माझ्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद,विकासासाठी प्रेरणादायी...

आ.आशुतोष काळेंच्या विकास कामांचा साधू-संताकडून देखील गौरव ;सत्कार माझ्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद,विकासासाठी प्रेरणादायी – आ.आशुतोष काळे

आ.आशुतोष काळे यांचा सत्कार करतांना राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरलादीदी.

सत्कार परमेश्वराचा आशिर्वाद—
कोपरगावकरांना अपेक्षित असलेला विकास साधतांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी नागरिकांच्या आशीर्वादाची व सहकार्याची गरज होती.ते आशीर्वाद आणि सहकार्य मिळत असल्यामुळे मतदार संघासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून पाठपुरावा करीत गेलो व त्या प्रयत्नांना व पाठपुराव्याला यश मिळत गेले. माझ्या प्रामाणिक प्रयत्नांची कोपरगावकर वारंवार दखल घेतातच मात्र आज साधू संतानी देखील दखल घेवून केलेला सत्कार माझ्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद असून हा आशिर्वाद भविष्यातील मतदार संघाच्या विकासासाठी प्रेरणादायी ठरणार आहे-आ.आशुतोष काळे

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव :- आपल्या जीवनात प्रत्येकाला पुण्य करण्याची संधी मिळत असते मात्र हि संधीप्रत्येकालाच ओळखता येत नाही.मात्र हि संधी आ. आशुतोस काळे यांनी नेमकी हेरून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवून पुण्याचे काम केले आहे.याची कोपरगावच्या नागरिकांबरोबरच साधू संतानी देखील दखल घेतली असून प्रजापिता ब्रह्मकुमारी स्पिरीचुअल सेंटर कोपरगाव यांच्यावतीने राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरलादीदी यांनी आ.आशुतोष काळे यांचा विशेष सत्कार केला आहे.

आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराचा विकास करून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेतच परंतु त्याच बरोबर कोपरगाव शहराचा प्रलंबित असणारा महिलांच्या अत्यं जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे ही जरी त्यांची जबाबदारी असली तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे हे मोठे पुण्याचे काम आहे.त्यामुळे अप्रत्यक्षपणे परमेश्वराचे आशिर्वाद त्यांना मिळणार आहेतच.त्याचबरोबर त्यांनी साठवण तलावालामिळविलेल्या १३१ कोटी निधीतील कोपरगावच्या जनतेवर भार पडणारी १५ टक्के रक्कम जवळपास २० कोटी रुपये देखील मंजूर करून आणले आहे त्यामुळे कोपरगावकरांचा आशीर्वाद देखील त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे या सत्कार सोहळ्याप्रसंगी ब्रह्मकुमारी स्पिरीचुअल सेंटर कोपरगाव यांच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी बिपीनराव कोल्हे,गौतम सहकारी बँकेचे चेअरमन सुधाकर दंडवते, संचालक दत्तात्रय खेमनर, अॅड.अशोक टुपके,डॉ.डी.जी.गायकवाड,डॉ. दिपक नाईकवाडे,सौ.सुधा ठोळे,डॉ.विलास आचारी,विजय बंब,उत्तमभाई शहा,डॉ.रमेश कोठारी,सौ.गायकवाड,राष्ट्रीय काँग्रेसचे तुषार पोटे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव,सोशल मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस अशोक आव्हाटे,जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी,शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,हाजीमेहमूद सय्यद,राजेंद्र वाकचौरे,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,डॉ.तुषार गलांडे,बाळासाहेब रुईकर,वाल्मिक लहिरे,संदीप कपिले,शैलेश साबळे,सचिन गवारे,मनोज नरोडे,योगेश नरोडे, महेशजी उदावंत,अॅड.मनोज कडू,रविंद्र राऊत,नारायण लांडगे,प्रताप गोसावी,दिलीप तुपसौंदर, नितीन शेलार,चंद्रकांत धोत्रे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!