Homeकोपरगावकोपरगाव तालुक्यात ८० वर्षीय इसम बिबट्याच्या हल्ल्यात जखमी

कोपरगाव तालुक्यात ८० वर्षीय इसम बिबट्याच्या हल्ल्यात जखमी

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव :- नवीन वर्षाच्या सुर्योदयापूर्वीच म्हणजे सकाळी ६ : ३० वाजताच बिबट्याने ८०वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केले आहे.परंतु,नसीब बलवत्तर होते म्हणून जीव वाचला.

सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील चासनळी तीन चारी येथील शेतकरी निवृत्ती सुकदेव तिडके हे आपल्या कुटुंबासह राहतात.दि.१ जानेवारी २४ रोजीच्या सकाळी ६:३० वाजेच्या दरम्यान दररोजच्या नित्यनेमाप्रमाणे ते आपल्या वस्तीच्या बाजूला शौचास गेले असता बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला त्यामध्ये त्यांच्या हाताला, पायाला,डोक्याला,नाकावर आणि उजव्या डोळ्याच्या खाली नखे लागून जखमा झालेल्या आहे.त्यांच्या हातातील काठीने त्यांनी प्रतिकार करत आरडाओरड केल्याने घरातील बाकीचे लोकांनी त्या दिशेने धाव घेतल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली आणि त्यांचा जीव वाचला.

गेल्या अनेक महिन्यापासून चास नळी परिसरात ४ ते ५ बिबट्यांचा वावर असल्याची तक्रार तेथील सामाजिक कार्यकर्ते पवनकुमार चांदगुडे व त्यांचे सहकारी यांनी अगोदरच ग्रामपंचायत मार्फत वनविभागास दि.२५जून २३ व दि.१३ डिसेंबर २३ रोजी लेखी पत्र देऊन सदर ठिकाणचे बिबटे पिंजरे लावून पकडण्यात यावे,येथील नागरीकांसह शेतात रात्री अपरात्री शेतीला पाणी भरणाऱ्या शेतकऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो असे आशयाचे पत्र दिलेले असतांना देखील वनविभागाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याने ताज्य घडलेल्या प्रकाराने नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.वनविभाग अधिकाऱ्यांच्या हालगर्जीपणामुळे विनाकारण एका निष्पाप शेतकऱ्याचा बळी गेला असता.गावकऱ्यांनी वनविभागाच्या भोंगळ कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त करत वनविभाग अजून कोणाचा बळी जाण्याची वाट पाहत आहे कि काय ? असे नागरीकांमधून बोलले जात आहे. वनविभाग अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पिंजरे लावून परिसरातील बिबटे पकडावे व नागरीकांना दिलासा द्यावा अशी नागरीकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.अन्यथा………. ?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!