Homeकोपरगावमा.ना.जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व मा. नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे- सावित्रीबाई...

मा.ना.जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व मा. नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे- सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान मार्फत दिला जाणारा सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्कार त्यांचा वारसा जपणाऱ्या सावित्री व जिजाऊ च्या लेकी मा.ना जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व मा. नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे यांना ज्येष्ठ साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मा.रंगनाथ पठारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.मानपत्र व येवला पैठणी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य निमंत्रक साऊ एकल महिला समितीच्या प्रतिमा हेरंब कुलकर्णी उपस्थित होत्या.संस्थेच्या अध्यक्षा संगीता मालकर यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेऊन आतापर्यंत करोना विधवांना सोळा लाखापर्यंत ची मदत उपलब्ध करून देऊन शिलाई मशीन व शेळ्या वाटपातून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला.पुरस्काराला उत्तर देताना मा.ना.शालिनीताई विखे पाटील यांनी गृहिणी ते जिल्हा परिषद अध्यक्षा प्रवास अतिशय ओघवत्या भाषेत सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले.माहेरच्या अंगणातला होणारा हा सन्मान खरोखरीच खूप आपुलकीचा व जबाबदारीची जाणीव करून देणारा वाटतो.वेळेचे महत्व,शिस्त,काम करताना किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी सांगितले.मा. सुहासिनी कोयटे यांनी देखील सत्काराला उत्तर देताना म्हटले की,समता बँक सर्व गोरगरीब गरजू लोकांच्या पाठीशी उभी राहते.अनेक गरजू महिलांना बचत गटांमार्फत काम,लघुउद्योगाबाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाते.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी मातृभाषेतून शिक्षण का महत्वाचे ?आयुष्य जगताना,शिकताना मातृभाषा किती महत्त्वाची आहे व असते हे त्यांनी सांगितले.भविष्यात येत्या दहा वर्षात सर्व शिक्षण,डिग्री,याकागदावरच राहतील,जीवन जगण्यासाठी त्याचा उपयोग होणार नाही.खऱ्या अर्थाने मुलं रुजवायचे असेल तर मातृभाषेतून शिक्षण अतिशय महत्त्वाची आहे.

अध्यक्षीय भाषणात प्रतिमा हेरंब कुलकर्णी यांनी पंडिता रमाबाई यांची आठवण करून देऊन त्यांनी महिलांसाठी त्या काळात केलेल्या कामाचा आढावा घेतला.एकल महिलांचे केलेले संघटन त्यांच्यासाठी उद्योग व्यवसायाची साऊ एकल महिला समितीमार्फत चाललेली धडपड याचा त्यांनी आढावा घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वाकचौरे,प्रा.डॉ. शीला गाडे यांनी केले. मानपत्राचे वाचन वर्षा आगरकर यांनी केले.त्यावेळी महानंदाचे चेअरमन राजेश आबा परजणे,महानंदाचे माजी संचालक पंडितराव जाधव,महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,उद्योगपती कैलास शेठ ठोळे, ज्येष्ठविधीज्ञ जयंत जोशी,ठाणे अंमलदार गलांडे मॅडम,विजुभाऊ बंब, महिला बालकल्याण विभागाचे पंडित वाघिरे,डॉ.कृष्णाने,डॉ.विजय क्षिरसागर त्याचप्रमाणे संस्थेच्या उपाध्यक्ष सुधाभाभी ठोळे,गीता रासकर, स्वाती मुळे,वर्षा झंवर,सुनिता ससाणे,वैजयंती बोरावके आदी सर्व सदस्य उपस्थित होते.शेवटी आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी केले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!