Homeकोपरगावओवी फिटनेस ऍण्ड वेलनेस सेंटरद्वारा मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर कुंभारी...

ओवी फिटनेस ऍण्ड वेलनेस सेंटरद्वारा मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर कुंभारी येथे उत्साहात संपन्न

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : सर्व सुख सोयीयुक्त आणि खात्रीशीर असा रिझल्ट देणारे नं.१ चे ओवी फिटनेस ऍण्ड वेलनेस सेंटर,रहिमपूर द्वारा,जागतिक आरोग्य सल्लागार सौ.वैशालीताई गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभारी येथे फ्री चेकअप कँप,मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न झाले.

यावेळ मार्गदर्शन करतांना सौ.गोंदकर म्हणाल्या की,चुकीच्या जीवनशैली मुळे उद्भवणारे शुगर,बीपी,पित्त,थायरॉईड, केस गळणे,पाठदुखी,कंबरदुखी, नैराश्य,अकाली वृद्धत्व या सारखे अनेक आजार डोके वर काढतात त्यामुळे माणसाचे जीवन विस्कटते आणि मनुष्य प्राणी त्रस्त होऊन चिडचिडा होतो. “जेवण बदलले की,जीवन बदलते”यामाध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना कळते की,आपण घरातील फॅमिलीसाठी आरोग्याच्या दृष्टीने कशा प्रकारचा आहार दिला पाहीजे,स्वयंपाकात काय बदल केला पाहिजे म्हणजे सर्वांचे आरोग्य चांगले राहिल.आम्ही त्यांचे किचन बदलतो “किचन बदलले कि,आरोग्य बदलते” आम्ही महाराष्ट्रात ९ महिन्यात ५७ किलो वजनाचा रिझल्ट काढलेला आहे असेही त्या शेवटी म्हणाल्या.

त्याचबरोबर डॉ.विजवराव संपतराव गोडगे यांनी देखील सदर कार्यक्रमात मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच माजी. सरपंच दिगंबर बढे यांसह आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर कँप कुंभारीचे युवा नेतृत्व असलेले सतिष भास्कर कदम व त्यांचे सहकारी मित्र संतोष मोहरे व गोरख पांडुरंग कदम यांच्या व आदिंच्या सहकाऱ्याने बुधवार दि.१७ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.यामध्ये जवळपास ७० ते ८० लाभार्थ्यांनी या शिबीराचा लाभ घेतला असल्याचे आयोजकांकडुन सांगण्यात आले आहे.

सदर कँपमध्ये जागतिक आरोग्य सल्लागार सौ.वैशालीताई गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब जोंधळे,गणपत शिंदे,रविंद्र गुंजाळ,राजेंद्र औताडे,अशोक जाधव,अंकीत औताडे,तुषार रोहमारे,मल्हारी देशमुख या टिमने मोफत आरोग्य तपासणी करून प्रत्येकास योग्य असे मार्गदर्शन केले.

आलेल्या टिमला राघवेश्वराचे व राघवेश्वर देवस्थानचे मठाधिपती श्री श्री १०८ महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांचे आशिर्वाद लाभले. आलेल्या टिमचा छोटेखानी सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी पंचक्रोशीतील महिला – भागिणी,तरूण-तरूणी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रास्तविक व शेवटी आभार प्रदर्शन सुनिल चंदनशिव सर यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!