
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव :सन 2023 मध्ये महाराष्ट्र कला संचालनालय,पुणे यांचे कडून घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला परिक्षा (इंटर्मिजेट) मध्ये संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल च्या सर्व 16 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून शाळेतील विद्यार्थिनी कुमारी श्रावणी रणजित महाले हिने उच्च द्वितीय श्रेणीत यश संपादन केले आहे.या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे कलाशिक्षक सचिन पाटसकर सर व श्रीमती.शेख मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय बिपिनदादा कोल्हे साहेब,प्रथम महिला आमदार आदरणीय सौ.स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे साहेब,सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष आदरणीय विवेकभैय्या कोल्हे साहेब,संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे,प्राचार्य मोहसीन शेख सर, अकॅडमी हेड नळे सर,शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी,सर्व विद्यार्थी व पालकांनी गुणवंत विद्यार्थीनीचे अभिनंदन केले.