
*************************************************
श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांच्या चौतीसाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमीत्त किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे सहावे पुष्प ह.भ.प डॉ.शुभम महाराज कांडेकर यांनी गोवले
************************************************
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगांव :-भौतिक सुखातुन मनुष्याला सातत्यांने हाव सुटते,लोभीपणा अंगातुन जात नाही पण जोपर्यंत त्याच्याकडुन प्रिय वाटणा-या गोष्टी सुटत नाही तोपर्यंत परमार्थ घडत नाही त्यासाठी त्याग महत्वाचा आहे असे प्रतिपादन श्रीरामपुरतालुक्यातील उंबरगांव येथील ह.भ.प.डॉ.शुभम महाराज कांडेकर यांनी केले. त्यागातुनच देव जवळ येत असतो असेही ते म्हणाले.

तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांच्या चौतीसाव्या पुण्यतिथी सोहळयानिमीत्त किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यांत आले असुन शुक्रवारी त्याचे सहावे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.याप्रसंगी जुना पंचदशनाम आखाड्याचे ठाणाधिपती महंत भागवतानंदगिरी महाराज, साईकथाकार ह.भ.प.अरूण महाराज रोहोम, नादब्रम्ह वारकरी शिक्षणसंस्थेचे ह.भ.प.संतोष महाराज दिक्षीत,ह.भ.प. अरूण महाराज पगारे,व्यासपिठ चालक ह.भ.प.तुकाराम महाराज वेलजाळे, ह.भ.प.सोमेश्वरगिरी महाराज,अविनाश अकोलकर यांच्यासह कोकमठाण पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.
डॉ.शुभम महाराज कांडेकर पुढे म्हणाले की,ब्रम्हलिन संत रामदासी बाबा यांच्या परिसस्पर्शामुळे कोकमठाण भूमिला अलौकीक महत्व आले आहे. पुण्यवान होण्यांची संधी कोकमठाणवासियांना आली आहे,पण ती ओळखता यायला हवी.संत स्वतःअनुभव घेवुन ते जगाला देत असतात. सुर्य चंद्र जगाच्या कल्याणा साठीच आहे.शुब्द बीजापोटी नेहमीच रसाळ फळे येत असतात.कलियुगात स्वार्थ वाढल्यांने परमार्थाकडे वळणाऱ्यांची संख्या कमी आहे.जगतगुरू तुकाराम महाराजांनी अभंगवाणीतुन अध्यात्माची शिकवण दिली.ज्ञानोबा माउलींनी रेडयाच्या मुखी वेद वदविले, तेंव्हा प्रत्येकांने ज्ञानेश्वरी जरूर वाचावी.जगाला संत महात्म्यांच्या विचारांची गरज आहे.