Homeकोपरगावयुवा कर्तृत्वाचा गुणगौरव व्हावा ही कोपरगावची खरी संपत्ती - बिपीनदादा कोल्हे

युवा कर्तृत्वाचा गुणगौरव व्हावा ही कोपरगावची खरी संपत्ती – बिपीनदादा कोल्हे

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : तालुक्यातील चांदेकसारे येथील कुमारी स्वाती नामदेव होन ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झाल्याबददल तिचा संजीवनी उद्योग समुह व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शुक्रवारी बिपीनदादा कोल्हे यांनी पालकासह तिचा सत्कार केला. कु.स्वाती होन हीची शासनाच्या सेवेत उपअभियंता पदावर निवड झाली आहे.

श्री.बिपिनदादा कोल्हे पुढे म्हणाले की,अभ्यास,शिक्षण पद्धतीत आता आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे,पूर्वी अभ्यासाचे संदर्भ शोधायला खूप काळ जायचा परंतु आता भ्रमणध्वनी,माहितीचे महाजाल माध्यमातून ते सहज साध्य होत आहे.माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धात्मक परिक्षेत चमकले पाहिजे यासाठीच्या सर्व पायाभुत सुविधा निर्माण करून विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला पाठबळ दिले त्यामुळेच स्वाती होन सह अनेक विद्यार्थी स्पर्धात्मक परिक्षेत उत्तीर्ण झाले.संजीवनी अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत कुमारी स्वाती हिने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.शिक्षणाबरोबरच स्पर्धात्मक परीक्षा अभ्यासाचे मार्गदर्शन येथे दिले जाते,विद्याथ्यांनी जीवनात ध्येय बाळगावे आणि त्याच्या परिपुर्तीसाठी अभ्यास करावा.प्रत्येक माता-पिता आणि गुरुजन विद्यार्थ्यांना घडविण्यांसाठी पुढाकार घेत असतो.कुमारी स्वातीच्या यशामुळे तिच्या आई वडीलांचा नावलौकीक आणखी वाढला आहे. स्पर्धात्मक परीक्षा ह्या विद्यार्थी दशेला आकार देत असतात.यात अपयश आले तरी विद्यार्थ्यांनी घाबरून जायचे नसते.कुमारी स्वाती होन हिने प्रशासकीय कामकाज समजुन घेऊन जीवनांतील सर्वोच्च पदावर जावे.

याप्रसंगी उपाध्यक्ष मनेष गाडे,संचालक सर्वश्री.विश्वासराव महाले, त्र्यंबकराव सरोदे,निलेश देवकर,सतिष आव्हाड,निवृत्ती बनकर,बाळासाहेब वक्ते,रमेश घोडेराव,शरद थोरात,नामदेव होन,कार्यकारी संचालक बाजीराव जी.सुतार,साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे,सचिव तुळशीराम कानवडे,सभासद,शेतकरी,खाते प्रमुख,उपखाते प्रमुख आदि उपस्थीत होते.शेवटी उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!