Homeकोपरगावआठवडे बाजारातील दुकानदार व ग्राहकांना जागेवर मोफत पाण्याची सोय - काका कोयटे,अध्यक्ष

आठवडे बाजारातील दुकानदार व ग्राहकांना जागेवर मोफत पाण्याची सोय – काका कोयटे,अध्यक्ष

मुख्य संपादक -राजेद्र तासकर

कोपरगाव : शहरातील बाजारपेठ फुलविणे व दुकानदार,व्यापारी यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी आठवडे बाजार महत्त्वाचा मानला जातो.कारण ग्रामीण भागातून बाजारात येणारा ग्राहक हा स्थानिक व्यापारी दुकानदार यांच्याकडून देखील खरेदी करत असतो.सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून आठवडे बाजारात येणाऱ्या ग्राहक,दुकानदाराला पिण्यासाठी जागेवर मोफत थंडगार पाण्याची सोय कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशन करणार असल्याचे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.

समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक कांतीलाल हरलाल जोशी यांच्या शुभ हस्ते चालत्या फिरत्या पाणपोईचे उद्घाटन समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक चांगदेव शिरोडे,किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमारजी बंब,व्यापारी महासंघाचे सचिव प्रदीप साखरे,नारायण अग्रवाल,महावीर सोनी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बाजार तळ या ठिकाणी करण्यात आले.या वेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशन कोपरगाव तालुक्यातील ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना व उपक्रम राबवत असतात.किराणा दुकानदार व व्यापारी तसेच ग्राहकांसाठी राबविण्यात आलेला हा एक आगळा – वेगळा अनोखा उपक्रम आहे.प्रत्येक आठवड्याला या चालत्या फिरत्या पाणपोई द्वारा ग्राहक दुकानदारांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणार आहे.

या वेळी व्यापारी महासंघाच्या बाजार तळ शाखेचे अध्यक्ष आशिष लोढा, हर्षल जोशी,अनिकेत भडकवाडे,संकेत दरक,हर्षल कृष्णानी,धीरज कराचीवाला,प्रकाश वाणी,कैलास नागरे,अरुण उदावंत,राहुल शिंदे,प्रणव वाणी,अनुप डागा,संदीप कपिले,नितीन भडकवाडे,नरेश जोशी,योगेश अंबोरे,प्रवीण पाटणी,सुधीर वडनेरे,विशाल उदावंत,विनोद मोरस्कर,सुमित हजारे,मनोज नीलक,उमेश पहाडे,संतोष कासलीवाल आदी व्यापारी व दुकानदार बहुसंख्येने उपस्थित होते.उपस्थितांचे आभार किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमारजी बंब यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!