Homeकोपरगावश्रीमान गोकुळचंदजी विदयालयांतील दिलीप कुडके यांना मराठी अध्यापन सेवा पुरस्कार प्रदान

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांतील दिलीप कुडके यांना मराठी अध्यापन सेवा पुरस्कार प्रदान

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : -कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयातील श्री. दिलीप कुडके यांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं मराठी ग्रामीण साहित्य संमेलानात राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ज्ञानज्योती बहुउदृशीय संस्थेच्या वतीने मराठी भाषेची निगडित सेवा प्रसार व संशोधन कार्याच्या अनमोल योगदाना बद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

श्री.दिलीप कुडके हे विदयालयातक्रीडा शिक्षक म्हणून देखिल कार्यरत असुन त्यांनी स्काऊट आणि गाईड मध्ये देखिल चांगले काम केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे,स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव सचिनअजमेरे,संदीप अजमेरे,डाॕ.अमोल अजमेरे,राजेश ठोळे,आनंद ठोळे,मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर,उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड,पर्यवेक्षक उमा रायते,विदयालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदिनी अभिनंदन केले आहे.

पुरस्काराला प्रत्योत्तर देतांना श्री.कुडके म्हणाले कि,या पुरस्काराने मला प्रेरणा मिळाली असुन मराठी भाषेसाठी चांगले कार्य करण्याची संधी मिळाली आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!