HomeUncategorizedसामाजिक सेवाभावी उपक्रमात ठोळे परीवार सदैव जेष्ठ नागरिक संघासोबत राहिल -उद्योजक कैलासचंद...

सामाजिक सेवाभावी उपक्रमात ठोळे परीवार सदैव जेष्ठ नागरिक संघासोबत राहिल -उद्योजक कैलासचंद ठोळे

मुख्य संपादक -राजेद्र तासकर

कोपरगाव – येथील जेष्ठ नागरिक सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष कै.भागचंद भाऊ ठोळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करताना कैलासशेठ ठोळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

त्यावेळी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की,कै.भागचंदभाऊ यांनी जे स्वप्न,जे विचार बाळगून जेष्ठ नागरिक सेवा मंचची स्थापना केली तेच विचार व सेवाभाव जपण्यासाठी आमचा ठोळे परीवार आजही कटिबद्ध आहे.सामाजिक सेवाभावी उपक्रमात पाहिजे ती मदत करायची तयारी आहे जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या माध्यमातून आजतागायत अनेक सामाजिक सेवाभावी उपक्रम राबविले गेले आहेत वैद्यकीय शिबिरे आयोजित केली आहेत,गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आलेअसून इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा दिली गेली आहे. यापुढेही मदतीला आम्ही कटिबद्ध राहु.असे विचार व्यक्त केले.

जेष्ठ नागरिक सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष कै.भागचंदभाऊ ठोळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित समारंभात स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष विजय बंब यांनी केले डॉ.विलास आचारी,उपाध्यक्ष दत्तोपंत कंगले,महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

पुण्यस्मरण दिनानिमित्त कै.भागचंद भाऊ ठोळे यांच्या पत्नी श्रीमती कमलबाई ठोळे,चार्टर्ड अकौंटंट एस एल कुलकर्णी,एड.शंतनु धोर्डे,उत्तम भाई शहा,आशुतोष पटवर्धन,पेंटर महंमद दारुवाला,मंचच्या अध्यक्षा सौ सुधाभाभी ठोळे,सौ.सुनयना केळकर ,मयुर जोबनपुत्रा,हेमचंद्र भवर, भागचंद माणिकचंद इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक,शिक्षक आदि मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या शेवटी विशालशेठ ठोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!