Homeकोपरगावदुसऱ्याच्या सुखात तल्लीन होऊन स्वतःचे दुःख विसरणे हेच खरे दिव्यांगांचे मनोबल -...

दुसऱ्याच्या सुखात तल्लीन होऊन स्वतःचे दुःख विसरणे हेच खरे दिव्यांगांचे मनोबल – मुकुंदमामा काळे

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : इ.१२वी च्या नुकत्याच लागलेल्या निकालात तालुक्यातील संवत्सर येथील संत रविदास चर्मकार युवा फाउंडेशन कोपरगाव महिला तालुकाध्यक्ष सौ.सुनिताताई नवनाथ पाचोरे व श्री.नवनाथ काशीनाथ पाचोरे यांची भाची कु.किरण साहेबराव जाधव हिने नामदेवराव परजणे पाटील (NPP) काॅलेज संवत्सर,बारावी कला शाखेमध्ये ७३.३३ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक व कु.प्रेरणा चांगदेव मैंद हीने ६१.८३ टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल दोघींचा श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य व भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलच्या वतिने शाल,श्रीफल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

या दोन्ही यशस्वी विद्यार्थीनींनी मिळविलेले यश हि खरी संवत्सर गावासाठी अभिमानाची बाब आहे.या दोन्ही गुणवंत विद्यार्थीनींचा श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य व भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलच्या वतीने सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी बोलतांना श्री.मुकुंद मामा काळे म्हणाले कि,आम्ही दिव्यांग नेहमी दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतो तर सुखात तल्लीन होऊन स्वतःचे दुःख विसरून जातो. दुसऱ्याच्या सुख दु:खात स्वतःला विसरणे हेच खरे दिव्यांगांचे मनोबल असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य अहमदनगर जिल्हाध्यक्ष व भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री.मुकुंद मामा काळे व सौ.छायाताई मुकुंदमामा काळे यांनी कु.किरण जाधव व कु.प्रेरणा मैंद या यशस्वी विद्यार्थीनींचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर अशोक माळवदे,संतोष रांधव,डाॅ.श्री.मनोज भुजबळ, योगेश ससाणे,संदीप डोखे,अनंत वाकचौरे,अमोल माळवदे,शेखर बोरावके, मनोज चोपडे,ओकांर वढणे आदींनी अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!