HomeUncategorizedआमदार रणजितसिंह मोहिते यांनी केले कोल्हेंचे सांत्वन

आमदार रणजितसिंह मोहिते यांनी केले कोल्हेंचे सांत्वन

आमदार रणजीतसिंह मोहिते यांनी शनिवारी सिंधूताई कोल्हे यांची सांत्वनपर भेट घेतली.

संपादक – राजेंद्र तासकर
सहकार चळवळीचे प्रेरक आणि साखर उद्योगात सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बदल करून व्यावसायिकतेचे रूप देणारे ऋषीतुल्य व्यक्तीमत्व शंकरराव कोल्हे हरपले अशा शब्दात आमदार रणजितसिंह मोहिते यांनी श्रद्धांजली वाहिली.
शनिवारी आमदार रणजितसिंह मोहिते यांनी श्रीमती सिंधुताई कोल्हे यांची भेट घेऊन सांत्वन केले त्याप्रसंगी ते बोलत होते.
येथील उद्योगाला देशी तंत्रज्ञान देऊन पहिले स्टार्टअप नॅशनल हेवी इंजिनियरिंगच्या माध्यमातून साखर उद्योगाची मशिनरी तयार करण्याच्या कार्याला शंकरराव कोल्हे यांनी बळ दिले.त्याकाळी कुठल्याही फोर जी,फाईव्ह जी माहिती तंत्रज्ञान सुविधा नसतांना त्यांची कामगिरी आम्हा तरुणांना अत्यंत मार्गदर्शक व उद्योगांचे आयडौल म्हणून त्यांना संबोधित केले तर वावगे ठरणार नाही.कोल्हे यांची गाव पातळी पासून विधी मंडळापर्यंत काम करण्याची हातोटी अत्यंत वेगळी होती. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्याशी आमदार रणजितसिंह मोहिते यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांचेही सांत्वन केले व मोहिते उद्योग समूह कोल्हे यांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले.

       
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!