
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव :- दिव्यांगावर अनेक स्तरावरुन होत असलेले अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देण्याकरीता अपंग नेते तथा संस्थापक अध्यक्ष मा.शेख अनिस पत्रकार यांनी अपंग जनता दल सामाजिक संघटनेची महाराष्ट्र राज्यात सुरुवात करुन अपंगांवर होणारे अन्याय व अत्याचार विरोधात दिव्यांगाकरीता उभारलेल्या लढयाला बळ देण्यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनेने महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदाची मोठया अपेक्षेने व महत्वपूर्ण जबाबदारी दुसऱ्यांदा कोपरगाव येथील दिव्यांग मा.श्री.बाळासाहेब लांडे यांच्यावर दि.२५/०७/२०२४ रोजी सोपविली आहे.संघटनेच्या वतीने त्यांना नियुक्तीचे पत्र संस्थापक अध्यक्ष पत्रकार अनिसभाई शेख यांच्या हस्ते देण्यात आले आहे.दिव्यांगांचे प्रलंबीत प्रश्नांची सोडवूक संघटनेच्या माध्यमातून करतील अशी अपेक्षा व्यक्त करून संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
महाराष्ट्रातील जाती धर्माच्या व समुहाच्या पुढे जाऊन एकोपा व एकत्रितपणे लढण्यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या दिव्यांगांच्या लढ्यात आपण मला दुसऱ्यांदा सामिल केल्यामुळे निश्चितच माझ्या हातून दिव्यांगांना न्याय मिळेल त्याचबरोबर अपंग जनता दल सामाजिक संघटना संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत मोठ्या जोमाने पोहचवण्याचा विडा मी उचलला असल्याचे मा.श्री. बाळासाहेब लांडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
दिव्यांप्रती त्यांच्या या निवडीबद्दल व भावी वाटचालीस सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.