
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव :- 3 ऑगस्ट म्हणजेच राष्ट्रीय अवयवदान दिवस,तीन ऑगस्ट ला देशातील पहिली हृदय प्रत्यारोपण शरस्क्रिया करण्यात आली तिची आठवण म्हणून हा दिवस राष्ट्रीय अवयवदान म्हणून साजरा केला जातो.
3 ऑगष्ट 2010 पासून राष्ट्रीय अवयवदान दिन साजरा करण्यास सुरवात झाली.एखाद्याला नवीन जीवनदान देण्यासाठी अवयवदान करणे काळाची गरज आहे हा एक उदात्य मार्ग असु शकतो.अवयवदान दिनानिमित्त आपण जागरूकता वाढवूया आणि अधिकाधिक लोकांना अवयव दाता म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करूया.एका अवयवदात्यामुळे आठ पेक्षा अधिक लोकांना याचा फायदा होतो,नवीन जीवनदान मिळते. अवयवदानाच्या माध्यमातून आपले मौल्यवान अवयव दान करण्याचा संकल्प करण्याची आणि पुढे येण्याची संधी आपल्या सर्वांना आहे, अवयवदान जागृती वाढल्याने अधिकाधिक लोकांना अवयवदान करण्यास प्रोत्साहन मिळू शकते,अवयवदान दानाचे मुख्यता जिवंतपणी,मृत्यू शयेवर, मृत्यूनंतर असे प्रकार पडतात
1) जिवंतपणी अवयवदान :- जिवंत अवयवदान ही एक अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया आहे,ज्यामध्ये जीवंत व्यक्ती एक मूत्रपिंड,यकृताचा एक भाग, स्वादुपिंड चा एक भाग दान करू शकते 2)मृत्यू शयेवरीलअवयवदान दान :-ज्यावेळी एखादा रूग्ण डॉ. ब्रँनडेड म्हणून घोषित करतात तेव्हा त्याच्या शरीरातील हृदय,किडनी, यकृत, फुफुस,लहान व मोठी आतडे, स्वादुपिंड,डोळे,हाडे,त्वचा इ अवयव दान करता येतात 3) मृत्यू नंतर अवयवदान:- मृत्यू नंतर नेत्रदान, त्वचादन,देहदान करता येते.
आज प्रत्येक दिवशी शेवटच्या टप्प्यातील अवयव निकामी झालेल्या रुग्णाचा अवयवाची वाट पाहत असताना त्यांना अवयव मिळत नाही व मृत्यू होत आहे आणि अवयवदानाची प्रतिक्षा यादीत आणखी बरेंच जण जोडली जात आहेत,भारत देश आजही प्रत्यारोपणासाठी दात्यांच्या आणि अवयवाच्या कमतरतेशी झगडत आहे, विशेषता हृदय प्रत्यारोपनाची परिस्थिती अधिक वाईट आहे,क्षमता असूनही जीव वाचवू न शकणे ही जीवनाची सर्वात मोठी शोकांतिका आहे.अवयवदाना विषयी अनेक गैरसमजही पसरलेले असून त्यातला सर्वात मोठं गैरसमज म्हणजे या क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्था अवयवांचा काळाबाजार करतात पण एक लक्षात घेणे गरजेचे आहे की या श्रेत्रात काम करणाऱ्या संस्था अवयवदान संबंधित कायद्याअंतर्गत असलेल्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वानुसार काम करतात,NOTTO, SOTTO, ROTTO, ZTCC यांचं नियंत्रण या सर्वांवर असते.
अवयवदानाचा फॉर्म भरल्यानंतर संबंधित संस्था किंवा शासनाच्या वेबसाईटवर फॉर्म भरल्यानंतर त्यांना डोनर कार्ड देण्यात येते ते त्यांनी कायम जवळ बाळगायच असते किंवा जर फॉर्म भरला नसेल तरी देखील मृत्यूनंतर जवळच्या नातेवाईकांच्या संमतीने अवयवदान करता येते.
अवयवदान व देहदान या भिन्न प्रक्रिया असून हृदय,फुफुस,लहान आतडे इ अवयव फक्त मृत्यू शययेवर असताना व डॉक्टरांनी ब्रेनण्डेड घोषित केल्यावर करता येतात,मृत्यूनंतर फक्त त्वचा व नेत्रदान तसेच देहदान करता येते भाजलेल्या रुग्णांना त्वचा मिळाल्यास त्यांची जखम लवकर बरी होते तसेच नेत्रदानामुळे कोर्निया खराब झाल्यामुळे ज्यांची दृष्टी गेली अशांना नवीन दृष्टी कोर्नियल ट्रेसप्लान्ट मुळे येते,तामिळनाडू राज्य हे अवयवदानात पहिल्या क्रमांकावर असून तेथील सरकारने अवयवदान करण्याऱ्याचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील अस देखील जाहीर केलं आहे.
श्रीलंका हा देश अवयवदानात सर्वांत पुढे आहे कारण तेथे अवयवदान ही राष्ट्रीय संपत्ती जाहीर केली आहे,मृत्यू नंतर सहा तासांच्या आत नेत्रदान करता येते नेत्रदान करून अनेकांच्या जीवनातील अंधकार दूर होऊ शकतो, अवयवदान दान ही परंपरा बनावी व जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचवून अवयवदानात आपला देश पुढे कसा राहील यासाठी आजच्या दिवशी अवयवदानाचा फॉर्म भरून संकल्प करूया अवयवदान श्रेष्ठदान.
डॉ अशोक जी गावित्रे अवयवदान समुपदेशक