Homeकोपरगावकर्मवीर शंकररावजी काळे सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक कै.शिवाजीराव (आप्पा) माधवराव घुले कुंभारी...

कर्मवीर शंकररावजी काळे सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक कै.शिवाजीराव (आप्पा) माधवराव घुले कुंभारी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : -तालुक्यातील कुंभारी येथील रहिवासी व प्रगतशिल शेतकरी तथा कर्मवीर शंकररावजी काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक तसेच कुंभारी गावचे माजी. उपसरपंच कै.शिवाजीराव (आप्पा) माधवराव घुले यांचे नाशिक येथे रुग्णालयात उपचार सुरू असतांना अल्पशा आजाराने दि. ८ ऑगष्ट २०२४ रोजी निधन झाले.

कर्मवीर शंकरराव सहकारी साखर कारखान्याचे माजी.व्हाईस चेअरमन स्वर्गीय.एकनाथराव माधवराव घुले यांचे लहान बंधु तसेच कुंभारी गावचे लोकनियुक्त माजी.सरपंच श्री.प्रशांत एकनाथराव घुले यांचे चुलते तसेच विद्यमान सरपंच सौ.देवयानी प्रशांत घुले यांचे सासरे आणि अभिजीत, नितिन,सिद्धांत घुले यांचे ते वडिल होते.

त्यांच्या पश्चात पत्नी,मोठी भावजई, मुले,पुतणे,सुना,नातवंड असा मोठा परिवार आहे.

घुले परिवारास या दुःखातून सावरण्याची परमेश्वर शक्ती देवो हिच प्रार्थना.

॥भावपूर्ण श्रध्दांजली💐💐॥

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!