Homeकोपरगावदोन तालुक्याच्या सिमेलगत नाटेगाव या ग्रामीण भागातील रस्त्यांकडे आजी - माजी लोकप्रतिनिधिंचे...

दोन तालुक्याच्या सिमेलगत नाटेगाव या ग्रामीण भागातील रस्त्यांकडे आजी – माजी लोकप्रतिनिधिंचे दुर्लक्ष – सामाजिक कार्यकर्ते खंडु मोरे

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : -दोन तालुक्याच्या सिमेलगत असलेले कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव या ग्रामीण भागातील रस्त्यांकडे आजी – माजी लोकप्रतिनिधिंचे दुर्लक्ष होत असून त्याचा त्रास ग्रामीण भागातील जनतेला विशेषत: दोन तालुक्याच्या सिमेवर असलेल्या नाटेगाव या ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागत असल्याची खंत नाटेगाव चे सामाजिक कार्यकर्ते खंडु विश्वनाथ मोरे यांनी आपल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले कि,उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय सार्वजनिक बांधकाम उपविभाग,कोपरगाव यांचेकडे आपले सरकार पोर्टलवर सदर नाटेगाव ते येसगाव हा रस्ता कोपरगाव तालुक्याच्या ठिकाणी दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा असून दवाखाना,शाळा,कॉलेज, महाविद्यालये,शेतीची कामे,दु्ग्ध व्यवसाय तसेच विविध शासकीय कामासाठी तालुक्याला जोडलेला रस्ता असून सदर रस्ता प्रमाणापेक्षा जास्त खराब झालेला असून त्याचे पक्क्या रस्त्यात रूपांतर करण्यात यावे याबाबत दि.२०फेब्रुवारी २०२३ रोजी मागणी अर्ज दाखल केला होता त्यास संबधित अधिकारी यांनी सदर नाटेगाव ते येसगाव रस्ता हा सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या आखात्यारित येत नसून सदरील रस्ता हा प्रजिमा २१२ दर्जाचा असून तो उपविभागीय अभियंता जि.प.(सा.बा) उपविभाग बांधकाम आखत्यारित येत असल्याचा निर्वाळ देऊन संबंधितांनी आपली सोडवणूक करून घेऊन याकडे सपसेल दुर्लक्ष केल्याचे दिसत असल्याचे श्री.मोरे यांनी म्हटले आहे.

ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी शासन मोठमोठे निधी उपलब्ध करून देत असून सुद्धा देखील तालुक्यातील टेल चे (शेवटचे) टोकाचे नाटेगाव यापासून वंचित का ?याला जबाबदार कोण ?असा सवाल आजी -माजी लोकप्रतिनीधींना सामाजिक कार्यकर्ते खंडु मोरे यांनी याद्वारे केला आहे.

ग्रामीण भागातील रस्ते म्हणजे शेतकऱ्यांची धमणी असून याकडे संबंधितांनी वेळीच लक्ष देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावे हिच माफक अपेक्षा शेवटी त्यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!