
हजारो कोटींच्या वल्गना पण दहा कोटींचा झगडे फाटा पोहेगावं रांजणगाव देशमुख रस्ता देखील नीट करता आला नाही त्यांनी असे दुसऱ्यांचे योगदान असताना त्यांना डावलून स्वतःचे घरचं तळे असल्यासारखं वागणे हे जनतेला अजिबात रूचलेले नाही. हे नगरपालिकेचे तळे आहे आणि श्रेय घेताना मात्र स्वतःचे शेततळे असल्याचे भासवत आहे.
******************************************************
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव प्रतिनिधी : – कोपरगाव शहराचा नेहमी ऐरणीवर असणारा पाणी प्रश्न वेगळ्या वळणावर गेला आहे. नगरपरिषदेने पाण्याचे नियोजन करताना शहराला भेडसावणारी पाणी टंचाई कमी होण्यासाठी आणि भविष्याचा वेध घेऊन जमिनी मिळवण्यापासून ते आजपर्यंतचा प्रवास उल्लेखनीय आहे.या तलावाचे जलपूजन करून श्रेय घेणाऱ्या आमदार आशुतोष काळे यांना कोपरगावकरांनी विरोध दर्शवत आम्ही सामान्य जनतेच्या हातून हे जलपूजन करून घेत संधी साधू ऐवजी साधू संतांच्या व सामान्य जनतेच्या हातून सोहळा करण्याचा मानस आहे.जनतेच्या मनातील व बाजूने होणाऱ्या या कार्यक्रमास पत्रकार बांधव,नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे देखील जाहीर करण्यात आले आहे.
सुरवातीला चार साठवण तलाव असताना पाणी कमी पडत होते. त्यासाठी शहराला पाणी मिळावे म्हणून अनेकांनी लढा उभारला. सर्वश्री राजेश मंटाला,संजय काळे व अनेक अज्ञात व्यक्ती समाजवेक आपल्या पद्धतीने लढत होते.मुळातच पाच नंबर तलावाचे श्रेय घेण्यासाठी आमदार काळे यांनी प्रयत्न करू नये कारण गायत्री कन्स्ट्रक्शनचे अखिल भारतीय काँग्रेसचे राज्य सभेतील खासदार TSR रेड्डी यांना शरद पवार साहेब व नितीन गडकरी यांनी या तळ्याच्या कामासाठी मदत करण्यास सांगितले म्हणून हे शक्य झाले.त्या कामात सर्व समाजसेवक एकत्रित लढले तसेच तात्कालिक नगराध्यक्ष विजय वहाडणे व त्यांच्या सोबत सर्व नगरसेवकांनी ठराव केला मदत केली म्हणून आज पाच नंबर पूर्ण झाले आहे.
******************************************************
विजय जाधव (किसान काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष)-
स्वतःची लाल करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे अनेकांना यात रस उरला नसून अतिशय प्रामाणिक प्रयत्न करूनही खरे लढणारे बाजूला राहतात पण नको ते लोक यात श्रेय घेत असतील तर आम्ही लढून शेवटी काय ? स्वत:ची लाल करण्यातआम्ही कमी पडतो हे दिसते आहे याचा विचार जनतेने करावा अशी त्यांची भावना सर्व सामान्य जनतेत होते आहे.
******************************************************
या तलावासाठी निधी उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना दिला त्यात आमदार काळे यांचा कवडीचा संबंध नाही. हे तळे होण्यासाठी सर्वाधिक मोठे योगदान कधीच कुणी नाकारू शकत नाही असे ते म्हणजे माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी जमिनी उपलब्ध करून दिल्या आणि शहराला जे काही आज पाचही तळे आहेत त्यासाठी त्यांचे नाव कधीच विस्मरणात जाऊ शकत नाही.आम्ही सामाजिक कार्यकर्ते,या कामात मंत्रालय व अगदी पंतप्रधान कार्यालय इथवर पाठपुरावा करणारे राजेश मंटाला व मंगेश पाटील,न्यायालयीन स्तरावर लढणारे संजय काळे व राजकीय कामात मदत करणारे आणि गायत्रीचे रेड्डी यांच्याशी मीटिंग आम्ही एकत्रित येत्या काही दिवसात शुभ मुहूर्तावर पाच नंबर तलावाचे जलपूजन करणार आहोत.यासाठी मोठी मदत झालेले गायत्री कन्स्ट्रक्शनचे खा.श्री.रेड्डी यांचा मोबाईल नंबर देखील महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस,सचिव नितीन शिंदे यांनी काळे यांना दिला होता त्यामुळे त्यांनी श्रेय घेणे हास्यास्पद आहे.श्री विजय वहाडणे यांना माजी नगराध्यक्ष असताना व माजी नगरसेवकांना देखील कुठेही विश्वासात घेतले जात नाही. खासदार श्री रेड्डी यांना देखील जलपूजन करण्यासाठी निमंत्रित करणार आहोत अशी थेट संपर्क असणारे नितीन शिंदे यांनी माहिती दिली आहे.