Homeकोपरगावचारूदत्त ढेकणे यांचे केले मरणोत्तर नेत्रदान

चारूदत्त ढेकणे यांचे केले मरणोत्तर नेत्रदान

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : – दिपावली सण हा सगळीकडे पणती पेटवून सर्वजण धूमधडक्यात साजरा करतात व करत आहे परंतु,दुसऱ्याच्या आयुष्यातील अंधार कायमचा दूर करुन त्यांच आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी मृत्यू नंतर स्वतःच नेत्रदान करून दोन अंध व्यक्तीच आयुष्य अंधारा कडुन प्रकाशाकडे नेण्याचे मरणोत्तर पूण्य कर्म तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील चारुदत्त ढेकणे यांनी केले आहे.

चारुदत्त ढेकणे व त्यांच्या पत्नी पुणे येथे कर सल्लागार म्हणून काम करत होत्या दीपावली निमित्त ते त्यांच्या मूळ गावी कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे आले असता, सकाळी मॉर्निग वॉक करत असताना त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला.परंतु, त्यांना आपल्या मृत्यू नंतर नेत्रदान करायच आहे ही इच्छा त्यांनी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना सांगितली होती.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने क्षणाचाही विलंब न करता इतरांना कळविले कि,त्यांची मरणोत्तर अवयवदानाची इच्छा होती ती पूर्ण करावी लागेल,यावर त्यांचा मृतदेह त्वरीत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आला व नेत्रदान तसेच अवयवदान,देहदान समुपदेशक,ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ.अशोक गावित्रे यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

सदर टिम ने संपूर्ण प्रक्रिया करून त्यांचं नेत्रदान करून घेतले यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.गिरीश गिटे, डॉ.हूलारे,डॉ.आतिष काळे,तोसिफ शेख,विक्रम वाल्मिक तसेच प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या डॉ.अनन्या,डॉ. हिमानी तसेच माहेगाव देशमुख येथील ग्रामस्थ श्री उल्लास काळे, रवींद्र काळे, दत्तत्रय काळे,सचीन देशमुख,बारकू चोथे,जीवन ढेकणे (भाऊ), मुलगा ओंकार,पत्नी सुचेता ढेकणे आदींचे सहकार्य लाभले.

“मरावे परी नेत्ररूपी उरावे” हे वाक्य चारूदत्त ढेकणे यांनी सार्थक करुन दाखवले त्यांच्या या कार्याने सर्व स्तरातून त्यांचे कोतुक होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!