
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव – नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन पुस्तक प्रकाशन करण्यासाठी सदैव तत्पर असणारी शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी पदग्रहण समारंभ सोमवारी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला असल्याचे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन, प्रेरणा देऊन व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.विविध स्पर्धा घेऊन उत्तेजना दिली जाऊन नवोदित साहित्यिकांचे साहित्य प्रकाशित करण्यात येत असते. अशा शब्दगंध साहित्यिक परिषद कोपरगाव शाखेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीत अध्यक्षपदी माजी नगराध्यक्षा कवयित्री सौ. ऐश्वर्याताई संजय सातभाई यांची एकमताने निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी राजेंद्र ( सुधिर ) कोयटे, उपाध्यक्षपदी कवी कैलास साळगट व अजित कसाब, सचिवपदी स्वातीताई मुळे, सहसचिव बाळासाहेब देवकर, खजिनदार एड. सौ श्रद्धा जवाद, सल्लागार म्हणून माजी नगराध्यक्ष पदमकांत कुदळे, सौ. वंदनाताई चिकटे, कार्यकारी सदस्य प्रा डॉ संजय दवंगे, प्रसिद्धी प्रमुख हेमचंद्र भवर, सदस्यपदी प्रमोद येवले, प्रा मधुमिता निळेकर, एड शितल देशमुख, अनंत बर्गे, सौ. शैलजाताई रोहोम आदींची निवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ माजी नगराध्यक्ष पदमकांत कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून कवी प्रा.अमोल चिने तर प्रमुख उपस्थितीत शब्दगंध साहित्यिक परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ऊदागे, संस्थापक सचिव सुनील गोसावी, साहित्यिक लायन डॉ राजेंद्र फंड उपस्थित राहणार आहेत.
कोपरगाव शहर व तालुक्यातील साहित्यिक व साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे समारंभ सोमवार दिनांक २७ जानेवारी रोजी सायंकाळी ब्राह्मण सभा मंगल कार्यालय कोपरगाव येथे होणार असून नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देणारा आहे.