Homeकोपरगावसंत गाडगेबाबा प्रतिष्ठान कुंभारी चे वतीने कर्मयोगी संत गाडगे महाराजांची १४९ वी...

संत गाडगेबाबा प्रतिष्ठान कुंभारी चे वतीने कर्मयोगी संत गाडगे महाराजांची १४९ वी जयंती उत्साहात साजरी

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : – संत गाडगेबाबा प्रतिष्ठान कुंभारी यांचे वतीने अवघ्या जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे कर्मयोगी संत गाडगे महाराज यांची १४९ वी जयंती धोबी परीट सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष मा. श्री.सुनील फंड यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी कोपरगाव तालुका प्रमुख दीपक पवार, रविंद्र राऊत, अरुण शिरसाठ, विजय जाधव, संतोष गायकवाड, अनिल देसाई, ह.भ.प. राजगुरू महाराज, आकाश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्याचबरोबर शिवसेना ( ठाकरे गट) उपतालुका प्रमुख राजुभाई शेख, सतीश भास्करराव कदम, पत्रकार राजेंद्र तासकर, किरण बढे, आकाश कदम, चंद्रकांत पैठणे गुरु आदी मान्यवर कार्यक्रमासाठी आवर्जुन उपस्थित होते.आलेल्या मान्यवरांचा संत गाडगे महाराज प्रतिष्ठान कुंभारी यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पूष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. सुनीलजी फंड व मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलतांना ते म्हणाले कि, संत गाडगे

महाराज हे स्वच्छतेचे आणि अंधश्रध्दा निर्मूलनाचे पहिले जनक होते व त्यांनी स्वतः सुरूवात करून बघता बघता अवघ्या जगाला “जन स्वच्छतेबरोबर मन स्वच्छतेचे ‘ महत्व व महती आपल्या किर्तनातून पटवून जनमनात रुजविली. त्यांनी आपल्या कार्यातून समाजप्रबोधन केले. श्रमप्रतिष्ठेचा संदेश देत संपूर्ण समाजाला नवा विचार दिला व आयुष्यभर कष्टाला महत्व दिले असल्याचे सांगितले.मी त्यांच्या विचारांचे अनुकरण बोलण्यातून नाही तर कृतीतून समाजासाठी करत आहे असेही ते शेवटी

म्हणाले. याचबरोबर रविंद्र राऊत, दिपक पवार, हभप.राजगुरू महाराज

यांनी तसेच छोटेखानी गुरू गायकवाड, विराज वाघ, कार्तिकी गायकवाड,आरती वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बालगोपाळ, महिला, ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजक संत गाडगे महाराज प्रतिष्ठान कुंभारी अध्यक्ष दीपक वाघ,उपाध्यक्ष निलेश गायकवाड,सचिव यशवंत गायकवाड,
संचालक भानुदास गायकवाड, विठ्ठल गायकवाड, सुनील गायकवाड, सुरेश गायकवाड, भास्कर गायकवाड, उद्धव गायकवाड,दत्तात्रय गायकवाड, सागर गायकवाड यांच्या वतीने संत गाडगे महाराजांचा प्रसाद म्हणून सर्वांना जेवणाची मेजवानी देण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमण यादव गायकवाड यांनी मांडले तर
सूत्रसंचलन कु.आदिती दिपक वाघ व सौ. सोनाली निलेश गायकवाड यांनी केले व शेवटी उपस्थितांचे आभार यशवंत गायकवाड यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!