
गुरु शुक्राचार्य मंदिराच्या वेबसाईटचे निर्माते ओंकार आव्हाड यांचा यथोचित सत्कार करताना.
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
***********************
- ॥ शिव पिंडीस चांदीचा मुलामा ॥
- गुरु शुक्राचार्य मंदिरातील शिवपिंडीस चांदीचा मुलामा देण्यासाठी भक्तांना आवाहन करीत असतो, त्याला प्रतिसाद म्हणून कोपरगांव येथील व्यापारी कै.मोहनशेठ झंवर याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या पत्नी श्रीमती सुमनताई झंवर व परिवाराच्या वतीने सव्वा किलो चांदी शुक्राचार्य महाराजांच्या चरणी अर्पण केली आहे.
- *****************************************************
कोपरगांव : – जगातील एकमेव मंदिर असलेल्या येथील बेटभागातील ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, श्रीगुरु शुक्राचार्य मंदिराची महती जगभर पोहोचावी या उद्देशाने डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट गुरु शुक्राचार्य मंदिर डॉट कॉम नावाची वेबसाईट तयार केली असून त्याची लॉन्चिंग निर्माते ओंकार बाळासाहेब आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.या वेबसाईट द्वारे मंदिराची सर्व महती भावित भक्तांना पहावयास मिळेल व जगभर गुरु शुक्राचार्य महाराजांची महती पोहोचेल हा उद्देश असल्याचे यावेळी आव्हाड यांनी सांगितले.

हिंदु धर्मात अत्यंत पवित्र समजला जाणारा महाशिवरात्री उत्सव बुधवार 26 फेब्रुवारी रोजी असुन त्याबाबत माहिती देण्यात आली. गुरु शुक्र स्थानावर कुठलेही शुभकार्य करण्यास मुहूर्त पहावा लागत नाही असे कोपरगांव शहरातून वाहणार्या पवित्र दक्षिणगंगा गोदावरी नदी किनारी वसलेले संजीवनी मंत्राचे उगमस्थान असलेल्या परम सदगुरु शुक्राचार्य मंदिर आहे.
नाशिक येथील राजेंद्र मुळे यांनी लिहिलेले शुक्राचार्य स्तवन या पुस्तिके बरोबरच ओंकार बाळासाहेब आव्हाड यांनी संकलीत केलेले हिंदीतील श्री शुक्र नित्य सेवा हे पुस्तक व त्यांनी तयार केलेली गुरु शुक्राचार्य महाराज मदिराची वेबसाईट www.gurushukracharyamandir.com चे लॉचिंग व बाळासाहेब आव्हाड लिखित शुक्रतिर्थ या मराठी पुस्तकाच्या नुतन सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा नासिक येथील वास्तुतज्ञ शशिकांत वांद्रे व माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कुंभ पर्व काळात भक्तांना अभिषेक करता यावा यासाठी प्रशासनाने नाममात्र दरात दिवसभर सामुदायिक अभिषेकाची सोय केलेली आहे. यासाठी लागणारे सर्व साहित्य मंदिर प्रशासनामार्फत दिले जाणार आहे. महाशिवरात्री उत्सवानंतर 2 मार्च रोजी सायंकाळी 8 वाजता सर्व शुक्रभक्त व शिवभक्तांसाठी महाप्रसाद भंडारा चे आयोजन संभाजीनगर येथील शुक्रभक्त धरमवीर अग्रवाल यांचे सुपूत्र लाला दुर्गादासजी मित्तल यांच्या वतीने आयोजित केला आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी शिवरात्री पर्वकाळात साजर्या होणार्या उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्व ट्रस्टी व मंदीर व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. प्रास्तविक मंदिरप्रमुख सचिन परदेशी तर आभार हेमंत पटवर्धन यांनी मानले.
या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,अॅड.संजीव कुलकर्णी, अॅड. गजानन कोर्हाळकर, सुहास कुलकर्णी, प्रसाद पर्हे, संजय वडांगळे, बाळासाहेब लकारे, सुजित वालझडे, विलास आव्हाड,दत्तात्रय सावंत, महेंद्र नाईकवाडे, राजेंद्रउर्फ मुन्ना आव्हाड, बाळासाहेब गाडे, विजय रोहम, दिलीप सांगळे, विकास शर्मा, भागचंद रुईकर, मधुकर साखरे, आदिनाथ ढाकणे, अरुण जोशी, विशाल राऊत राजाराम पावरा आदि उपस्थित होते.