Homeकोपरगावक्रांतीसुर्य डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कुंभारी सार्वजनिक वाचनालय येथे विनम्र अभिवादन

क्रांतीसुर्य डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कुंभारी सार्वजनिक वाचनालय येथे विनम्र अभिवादन

कोपरगाव : – क्रांतीसुर्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक वाचनालय कुंभारी येथे ग्रामस्थ व वाचक दिलिप बर्डे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

सार्वजनिक वाचनालयामध्ये वाचकांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन वाचक वर्ग अधिकाधिक वाढवण्यावर भर देऊन वाचकांसाठी अनेक उपक्रम राबविण्याबरोबर संत – महंता सह थोर महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरे करप्यात येत असतात. यासाठी ग्रामस्थांना आमंत्रित करुन वाचक वर्गास प्राधान्य देऊन त्यांच्या हस्ते असे उत्सव साजरे करण्यात येतात. असे वाचक वर्गातील प्रमुख मान्यवर दिलिप बर्डे यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर वाचनाने मनुष्याची बुद्धी चंचल होत असते, बौध्दीक ज्ञान प्राप्त होऊन मनुष्य ज्ञानी बनतो त्यासाठी प्रत्येकाने वाचन केले पाहिजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचनातूनच क्रांती केली म्हणूनच त्यांना क्रांतीसुर्य महामानव असे म्हटले आहे.असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे. यावेळी वाचनालयाच्या वतीने मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला .

यावेळी भगवान खळे, विकास खळे, भाऊसाहेब पवार, रामराव चंदनशिव, नरेंद्र भारती, रवि जाधव, शंकर चंदनशिव, पवार आदि महिला व ग्रामस्थ उपस्थित होते .

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक वाचनालयाचे अध्यक्ष रमणआण्णा गायकवाड यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार यशवंत गायकवाङ यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!