

कोपरगाव🪐 दि. २८ एप्रिल : – कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील गवारे वस्तीवर असलेल्या श्री वज्रेश्वरी मातेची यात्रा सालाबादप्रमाणे वर्धापन दिनाचे औचित्य साधून गावातील श्री.भगवान मारुती गवारे, श्री.विष्णु मारुती गवारे, श्री. रामभाऊ मारुती गवारे या दांपत्यांनी ब्राम्हण वृंदांच्या हस्ते विधिवत पूजन करून विविध उपक्रमांनी व रामायणाचार्य, भागवताचार्य ह.भ.प. परशुराम महाराज अनर्थे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
प्रवचनप्रसंगी रामायणाचार्य, भागवताचार्य ह.भ.प.परशुराम महाराज अनर्थे यांनी श्री वज्रेश्वरी मातेचा महीमा वर्णन करत सांगितले कि,भाविक भक्तांनी आपले दैनंदिन कर्तव्य, कर्म करीत असतांना भगवंताचे नामस्मरण करणे ही सुद्धा एक प्रकारे ईश्वर सेवा असल्याचा मोलाचा संदेश आपल्या प्रवचनातून त्यांनी दिला. यावेळी मोठया संख्येने भाविकांनी ज्ञानामृत श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी कोपरगाव संजीवनी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन श्री.राजेंद्र परजणे साहेब,भाजपा दिव्यांग सेल व माळी समाज जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा.फकीरराव बोरनरे, संवत्सर ग्रामपंचायतचे सदस्य मा. महेश परजणे, तुषार बारहाते,परीमल कोद्रे, रत्नाकर काळे,अशोकराव मगर, दीनेश बोरनरे, राजेंद्र बोरनरे, व्यंकटेश बारहाते, पोपट बोरनरे, दिलीप कासार, अविनाश बोरनरे, संदीप भाकरे, अतुल सांगळे, देविदास शिंदे, संभाजी शिंदे, राजेंद्र लुगांडे, अशोकराव कासार, कपिल ससाणे, संतोष ससाणे, सौ.लताताई रत्नाकर काळे, सौ.छायाताई मुकुंदमामा काळे, सौ.सुनिताताई नवनाथ पाचोरे व सौ.मोनालीताई कपिल ससाणे यांसह आदि भाविक भक्त , महिला, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
या संपुर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट पध्दतीने नियोजन केल्याबद्दल सर्व आयोजक, नियोजकांचे मुकुंद मामा काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच आयोजकांच्या वतीने आलेल्या भाविकांचे आभार व्यक्त करण्यात आले.