Homeकोपरगावशिष्यवृत्ती परीक्षेत 350 विद्यार्थ्यांस आत्मा मालिक राज्यात प्रथम

शिष्यवृत्ती परीक्षेत 350 विद्यार्थ्यांस आत्मा मालिक राज्यात प्रथम

कोपरगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी ची शिष्यवृत्ती परीक्षा 9 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाली होती. महाराष्ट्रात पुन्हा एकदा सर्वाधिक विद्यार्थी पात्र होणाऱ्या उच्चांक आत्मा मालिक सेमी इंग्लिश मीडियम ने साकारला आहे या गुरुकुलाचे 350 विद्यार्थी पात्र झाले आहे. यामध्ये 250 गुणांच्यापुढे 13 विद्यार्थी, 220 गुणांच्यापुढे 64 विद्यार्थी, 200 गुणांच्या पुढे 125 विद्यार्थी तर 180 गुणांच्यापुढे 216 विद्यार्थी आहेत. इयत्ता आठवी मध्ये चि. श्रेयश नलावडे 274 गुण, कु. धनश्री रक्ताटे 272 गुण, चि.श्रेयश भवर 272 गुण, चि. श्रीजीत इंगोले 268 गुण, चि. सिद्धार्थ पगारे 268 गुण, कु. तुळशी थोरात 260 गुण, चि. यश केणे 260 गुण, चि. पृथ्वीराज टोमे 256 गुण, चि. हासे राज 252 गुण, चि. पाटील शिवराज 250 गुण, चि. सोहम उंडे 250 गुण, मिळवून बाजी मारली आहे

तर इयत्ता पाचवी मध्ये चि. रितेश लपटे 262 गुण , चि. राजवीर कालेकर 252 गुण, चि. ओमकार गोल्हार २४६ गुण , चि. त्रैलोक्य चव्हाण 246 गुण, चि. जगदीश लोहकरे 238 गुण, चि. वेदांत कोठुळे 238 गुण, कु. स्वराली जाधव 234 गुण , चि. श्रीतेज दागडे 232 गुण, चि. साईनाथ गाडे 230 गुण, चि. साई कराळे 226 गुण, चि. साई सुरसे २२२ गुण, चि. तुषार गर्जे 222 गुण, मिळवून बाजी मारली आहे

सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश परीक्षा शालेय परीक्षांमध्ये आत्मा मालिक अव्वल स्थानी असून हे स्पर्धा परीक्षांच्या आत्मा मालिक पॅटर्नचे यश आहे असे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख रमेश कालेकर, शिवम तिवारी, सचिन डांगे, रवींद्र देठे,अनिल सोनवणे, बाळकृष्ण दौंड,मीना नरवडे, पर्यवेक्षक नितीन अनाप,नयना शेटे, गणेश रासने, सुनील पाटील तसेच विशेष शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी या विद्यार्थ्यांचे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीप कुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,वस्तीगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदींनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!