Homeकोपरगावचित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण ; श्री संत सावता माळी युवक संघाचा...

चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण ; श्री संत सावता माळी युवक संघाचा स्तुत्य उपक्रम – जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे

कोपरगाव : – तालुक्यातील रवंदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने दि. ११एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीनिमित चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जवळपास १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री संत सावता माळी युवक संघ अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष मुकुंद (मामा) किशोर काळे, प्रदीपजी नवले चेअरमन संजीवनी सहकारी पतसंस्था कोपरगाव, अशोक सोपान माळवदे तालुकाध्यक्ष संत सावता माळी युवक संघ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत सोनवणे, मुख्याध्यापक प्रभाकर कदम, डॉक्टर मनोज भुजबळ, शेखर बोरावके, अमोल माळवदे, योगेश ससाणे, संतोष रांधव, संदीप डोखे, अनंत वाकचौरे, मनोज चोपडे, ओंकार ओढणे, या मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीपजी नवले होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंदे येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला या स्पर्धेचा निकाल 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनी जाहीर करण्यात आला यामध्ये प्रथम क्रमांक प्रांजल संतोष कदम इयत्ता तिसरी हिने पटकविला असून, द्वितीय क्रमांक आर्या विलास गाडे तर तृतीय क्रमांक प्रणव कृष्णा बाविस्कर व समृद्धी महेश कदम यांनी पटकविला तर उत्तेजनार्थ बक्षिस तनिष्का दत्तात्रय वाघ हीस देण्यात आले. वरील सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श शिक्षक सोमनाथ मंडाळकर यांना उत्कृष्ट समाज कार्याबद्दल ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

” लहान मुलं हि देवा घरची फुलं ” असे मानणाऱ्या महापुरुषांच्या विचारांची पेरणी लहान वयात मुलांमध्ये करणे गरजेचे आहे, त्यांच्या कार्याची ओळख मुलांना व्हावी म्हणून श्री संत सावता माळी युवक संघ एकजुटीने काम करत आहे. समाजासाठी याचा निश्चित फायदा होण्यास मदत होईल असे मत मुकुंद मामा काळे यांनी व्यक्त केले. तसेच मुकुंद मामा काळे यांच्या मार्गदनाखाली संघटनेतील सर्व पदाधिकारी, सदस्य हे करत असलेले कार्य कौतुकास्पद असून त्यांचा हा स्तुत्य उपक्रम आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीपजी नवले यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी अंबादास भुसे, योगेश शिंदे, महेश कदम, बाळू आहेर, कराळे बेबी, लता साळवे, पल्लवी पवार, शितल मोरे, कविता झरेकर, चंद्रकला डांगे, भाऊसाहेब पवार, आदिनाथ जपे यांसह आदी शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ मंडाळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अशोक थोरात यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!