
कोपरगाव : – भारतीय जनता पार्टी कोपरगाव मतदारसंघ पश्चिम मंडल अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्द्ल कुंभारी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी नं. १ च्या वतीने मा. श्री. सुनिलजी कदम यांचा चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाच्या वतीने शाल, हार, श्रीफळ व पूष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
सत्कार समयी आपले मनोगत व्यक्त करतांना माजी. सरपंच दिगंबर बढे म्हणाले कि, सुनिल भाऊ कदम यांनी या पदाच्या माध्यमातून गावच्या विकासाच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाच्या ज्या काही योजना असतील त्यांचा लाभ सर्वांना मिळवून देण्याचा प्रयत्न करावा त्यांची निवड ही आपल्या गावाच्या दृष्टीने लाभदायक ठरावी अशी अपेक्षा सर्वांच्या वतीने व्यक्त करतो व मान.आमदार आशुतोषदादा काळे यांच्या वतीने, माझ्या व आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा देतो . त्याचबरोबर बापूसाहेब वारुळे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे बिपिनदादा कोल्हे,माजी.आमदार.सौ. स्नेहलताताई कोल्हे व मा. श्री. विवेकभैय्या कोल्हे यांनी जो विश्वास सुनिलभाऊ यांच्यावर टाकला तो सुनिलभाऊ पूर्णत्वास नेल्याशिवाय राहणार नाही हा माझा आत्मविश्वास सांगतो. कारण, मी १९८६ साली भाजपाचा तालुका उपाध्यक्ष होतो त्यावेळी हिच व्यक्ती माझ्या पाठीमागे भाजपाचा झेंडा घेऊन ठाम उभी होती हे माझ्या आजही आठवणीत आहे असे आवर्जुन सांगितले त्यांचे अभिनंदन व त्यांच्या पुढील कार्यास माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. यांसह आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.
सत्कारमुर्ती सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की, भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष मा. श्री. बावनकुळे साहेब महाराष्ट्र, आदरणीय मा. श्री. बिपिनदादा कोल्हे साहेब, कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला माजी. आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे, सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे कारखान्याचे चेअरमन आमचे आधारस्तंभ माननीय मा. श्री. विवेकभैय्या कोल्हे यांनी भारतीय जनता पार्टी कोपरगाव मंडल ( परिचम) अध्यक्ष म्हणून माझ्यावर जो विश्वास टाकला ज्या विश्वासाने जबाबदारी दिली ती मी कोपरगावच्या विकासासाठी आणि गावाच्या हितासाठी आत्मविश्वासाने पूर्ण करीन, तसेच या ठिकाणी जो माझा सत्कार करण्यात आला, तो माझा एकटयाचा नसून आपल्या सर्वांच्या एकजुटी आहे. त्याचबरोबर पुढील काळात अशीच एकजुटीने साथ मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करून आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो .
यावेळी सोसायटीचे माजी. चेअरमन अरूण पुंडलीक कदम, व्हा चेअरमन रंजना मच्छिंद्र कदम,माजी.व्हा. चेअरमन सतिष भास्करराव कदम, जेष्ठ संचालक जगन्नाथ भारती, मारूती चव्हाण, भागवत रायभान कदम, माजी. सरपंच दिगंबर बढे, बापूसाहेब वारुळे,गौतम पॉलिटेक्निकचे ओ.एस आण्णासाहेब बढे, मच्छिंद्र चांगदेव कदम, किरण जगन्नाथ बढे, क्लार्क खंडु चुंबळे, सेवक प्रशांत चिने यांसह संस्थेचे आजी – माजी चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.