Homeकोपरगावबच्चुभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा देत…… यांचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक...

बच्चुभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा देत…… यांचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांस निवेदन

कोपरगाव :- जगाचा पोसींदा शेतकरी जगला पाहिजे व समाजप्रवाहात दुर्बल असलेला दिव्यांग घटक याच्या जीवनाचा सुद्धा शासनाने अग्रहक्काने विचार केला पाहिजे यासाठी माजी. राज्यमंत्री तथा अचलपूर विधानसभेचे माजी.आमदार तसेच प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान. ओमप्रकाश तथा बच्चूभाऊ कडु यांनी अमरावती जिल्हयातील मोझरी येथे विविध मागण्यांसाठी ८ जून रोजी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे .

अन्नत्याग आंदोलनास सात दिवस होऊन गेले असतांना सुद्धा गेंडयाच्या जाड कातडीच्या सरकारने मात्र, कोणतीही दखल घेतलेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देत अहिल्यानगर जिल्हा प्रहार दिव्यांग संघटना व राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने

राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील साहेब व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब प्रशासनास निवेदन देऊन आमची आर्त हाक शासनापर्यंत पोहोचवावी या आशयाचे निवेदन देण्यात आले. बच्चू कडू हे आपल्या सतरा मागण्यावर ठाम आहेत. जर सरकारने मागण्या मान्य करून त्याची अंमलबजावणी केली नाही तर , आमच्या अंत यात्रेची तयारी करा. असे सरकारला सांगण्यात आले.

सदर मागण्यांवर 14 जून च्या अगोदर निर्णय घेतला नाही तर, अहिल्यानगर येथील जिल्हा कार्यालयावर मोर्चे, धरणे आंदोलन करण्यात येणार आहे काही दिव्यांग बांधव व शेतकरी उपोषणास बसणार आहेत तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन सुरू होणार आहेत त्याच्या होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील. अशी माहिती प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

बच्चू भाऊ कडु यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या प्रमुख मागण्या खाली प्रमाणे संजय गांधी पेन्शन मनपा दिव्यांग अनुदान(पेन्शन) 6000/- झालीच पाहिजे ,, शासनाच्या निवडणुकीतील प्रचार अभिवचना प्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊ शकते, ती झालीच पाहिजे या सह अन्य 17 मागण्या सरकारने मान्य केल्याच पाहीजेत अन्यथा महाराष्ट्रभर प्रहार स्टाईलने अंदोलन छेडण्यात येईल. शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी. अन्यथा…. ?

यावेळी उत्तर अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे, जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, तालुका अध्यक्ष योगेश लबडे, तालुका सचिव दत्तात्रय खेमनर,सुरेश दानवे, नानासाहेब शिंदे, जुबेर शेख, जालिंदर भोसले, विजय म्हसे, बाबासाहेब मुसळे , सतीश तरवडे, भरत आढाव, सचिन साळवे, सुरेश जगधने, मेजर नानासाहेब खपके, चंद्रकांत रेबडे, विठ्ठल पांडे, जगन्नाथ हापसे, शिवाजी जाधव, प्रतीक धिमते, संदिप कुलकर्णी, योगेश पवार, बापू निमसे आदि दिव्यांग बांधव मोठया संख्येने उपस्थित होत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!