Homeकोपरगावपांडुरंगाच्या नाम घोषाने कुंभारी नगरी दुमदुमली

पांडुरंगाच्या नाम घोषाने कुंभारी नगरी दुमदुमली

कोपरगाव : – तालुक्यातील कुंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक व गावठाण आंगणवाडी क्र.१ च्या चिमुकल्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने शनिवार दि. ५ जुलै रोजी पायी दिंडीचे आयोजन केले होते. यावेळी चिमुकल्यांच्या विठ्ठल नामाच्या गजराने कुंभारी नगरी दुमदुमुन गेली होती. जणु काही या नगरीला पंढरपुरचे स्वरूप आले होते, संपूर्ण परीसर भक्तीमय वातावरणात डुबुन गेला होता.

या वारी मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल – रूख्मिणी . संत ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, जनाबाई, एकनाथ, तुकाराम, नामदेव, आदि संतांच्या वेशभूषा करत सहभागी होऊन वारकरी संप्रदायाची परंपरा जपत टाळ – मृदुंगांच्या तालावर पावल्या सादर करत, डोक्यावर तुळस घेऊन नाचत – नाचत रिंगण करून यामध्ये फुगडी सारखे खेळ विशेष आकर्षण ठरत होते.

यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक – शिक्षिका , आंगणवाडी सेविका, मदतनिस यांनी अथक परिश्रम घेतले तसेच यामध्ये पालक व ग्रामस्थांनीही आपला सहभाग नोंदवला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!