
कोपरगाव : – मा.जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये, कोपरगाव तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या अंतर्गत रवंदे मंडलाधिकारी मा.कैलास खाडे सो. याचे मार्गदर्शनाखाली मा.चंद्रशेखर कुलथे सो. यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव तालुक्यातील महसुल व वन विभागांतर्गत दि. ९ जुलै रोजी रवंदे येथील ग्रामपंचायत हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे सकाळी ठिक १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये १२ गांवांचा समावेश करण्यात आला होता. या शिबीरामध्ये विविध प्रकारच्या १३० दाखल्यांचे व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

यासाठी नागरिकांनी उत्फुर्त प्रतिसाद दर्शविली व गरजवंत नागरिकांचा चांगल्या प्रकारे कल असल्याचे दिसून आले. मात्र, याच शिबीरात काही

नागरिकांनी रेशन विभागातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची सामान्य जनतेबरोबर वर्तणूकी संदर्भात नाराजी व्यक्त केली. याकडे तहसिलदार साहेबांनी जातीने लक्ष घालून सामान्य जनतेस सोपे व सुरुळीत कारभार कसा होईल यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रवंदे ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीम. शोभा बाबुराव भवर यांनी भूषविले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार तलाठी मा. श्री. दिनकर कातकडे यांनी केले

यावेळी महसुल नायब तहसिलदार मा. श्री. चंद्रशेखर कुलथे सो, रवंदे मंडलाधिकारी मा. श्री. कैलास खाडे सो, कामगार तलाठी श्री.दिनकर कातकडे – मळेगाव थडी, श्री.अण्णा वाघ – धारणगांव, श्री.नितीन सांगळे- कुंभारी, श्री.सौरभ घुमणे -धामोरी, श्रीम. शिवानी इसक – टाकळी ब्राम्हणगांव, श्रीम.बी. एस.लोखंडे- रवंदे तसेच ग्राम अधिकारी मा.श्री.जी. आर. कहार सो, मा. श्री. राजेंद्र बागले सो, महसूल सेवक श्री.नारायण ठाणगे, श्री. सचिन ताजणे, रवंदे उपसरपंच ऋषीकेश कदम तसेच श्री. नानाभाऊ जाधव प्रगतशील शेतकरी सांगवी भुसार यांसह आदि १२ गावांचे महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना महसुल नायब तहसिलदार मा. चंद्रशेखर कुलथे साहेब म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे तालुक्यात ६ महसुल मंडळांतर्गत राबविण्यात येत असून, पैकी रवंदे मंडलांतर्गत जोडलेल्या १२ गावांतील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवासी व उत्पन्नाचे- ६३, नॉन क्रिमिलिअर -१८,जातीचे दाखले -३, संजय गांधी योजना – ६, जीवंत ७/१२ फेरफार उतारे – २५, अॅग्रीटेक नोंदणी – १४ असे एकूण १३० प्रकरणे दुपारी १ वाजेपर्यंत लाभार्थ्यांना निकाली काढून सूपूर्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर रेशन कार्ड वाटप व सामाजिक लाभाच्या योजनेमध्ये संजय गांधी योजना, पीएम किसान योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पुर्तता करून घेण्यात आली.
महसुल विभागाशी संबंधित जनतेच्या तक्रारींचेही तात्काळ त्याच ठिकाणी निवारण करण्यात आले. यासाठी खास या शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
कार्यकम यशस्वीतेसाठी सर्व कामगार तलाठी , ग्राम अधिकारी, कर्मचारी, महसूल सेवक, सरपंच, उपसरपंच यांनी अथक परिश्रम घेतले .