
कोपरगाव : – कोपरगाव शहरासह संपूर्ण तालुक्यातील जनतेच्या सुख – दु : खात सहभागी होऊन प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष नेहमी मदतीचा हात पुढे करून धावून जाणारे शिक्षणाचा ध्यास असणारे शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त तसेच संजीवनी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आदरणिय श्री. बिपिनदादा कोल्हे साहेब यांनी २१ जून रोजीच्या वाढदिवसाच्या इतर खर्चाला फाटा देत तालुक्यातील गोरगरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहु नये. कारण, स्पर्धेच्या युगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही, ”शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे” ते प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेच पाहिजे असे विचार मनाशी बाळगून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुंभारी येथील रयत शिक्षण संस्थेच्या, गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयातील इ.५ वी. ते इ.१० वी पर्यतच्या विद्यार्थ्यांना ८२०, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याना ५९३ वह्यांचे वाटप ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संजीवनी उद्योग समुहाचे माजी. संचालक शिवाजीराव कदम, जेष्ठ नागरिक पोपटराव निळकंठ, सोसायटी नं. २ चे. चेअरमन सोपानराव चिने, राघवेश्वर ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष गोपीनाथ निळकंठ, भाजपाचे कोपरगाव तालुका पश्चिम मंडळ अध्यक्ष सुनिलराव कदम, पत्रकार राजेंद्र तासकर, पंढरीनाथ कदम, भानुदास घुले, विश्वंबर कदम,अहमदभाई शेख, राजेंद्र बढे, मारूती कदम, प्रकाश डांगे, नितिन मोहरे, विलास वाघ, कचेश्वर माळी, शब्बीरभाई शेख, रविंद्र रणशूर यांसह दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक -शिक्षिका व कर्मचारी वर्ग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे जेष्ठ नागरिक पोपटराव निळकंठ हे होते , तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीम. योगिता रणशूर मॅडम यांनी केले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष सुनिलराव कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी.एन. बागुल सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा सर्वांच्या वतीने गुलाब पूष्प देऊन सत्कार केला.सदर प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक बागुल सर, व सर्व स्टाप तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दरेकर सर व सर्व स्टाप उपस्थित होते. तर शेवटी उपस्थितांचे आभार श्री. चिंधे सर व जगदाळे सर यांनी मानले.
