Homeकोपरगाव….येथे श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी सोहळ्याची जय्यत तयारी

….येथे श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी सोहळ्याची जय्यत तयारी

मुख्य संपादक – राजेंद्र तासकर

कोपरगाव : – ” संत दर्शनाने थोरं लाभ झाला | अनंत जन्मीचा शिणं गेला ” या अभंग प्रमाणे श्री संत सावता माळी संजीवन समाधी सोहळा तालुक्यातील पुर्व भागातील संवत्सर येथे महाराष्ट्र माळी समाज महासंघ कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री.अनिल हरीभाऊ सोनवणे या ठिकाणी बुधवार दि. २३ जुलै रोजी सकाळी ठि.१० वाजता आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्ताने ह.भ.प. वाल्मिक महाराज जाधव यांचे सुश्राव्य जाहिर प्रवचन होणार आहे तरी पंचक्रोशातील सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा व ज्ञानामृत श्रवणाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज मंडळ,परीवार व अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!