
कोपरगाव : – ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेले शिक्षणाची व्यवस्था नसल्याने जेमतेम प्राथमिक शिक्षण घेऊन माध्यमिक शिक्षण श्रीरामपूर येथे पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी पूणे शहरात जाऊन लॉ कॉलेज (वकीली ) शिक्षण घेऊन शहरात विविध व्यवसाय किंवा नोकरीच्या संधी असतांना सुद्धा., तेथे त्यांचे मन रमले नाही, शेतीशी जुडलेली नाळ त्यांना अस्वस्थ करत होती अखेर मायभूमीत परतले आणि शेती करण्याचा निश्चय करून सर्वोत्कृष्ट शेतकरी आणि कर्तृत्ववान व दूरदृष्टी संपन्न असणारे कान्हेगाव येथील रहिवासी आदरणीय श्री. आसारामजी शंकरराव करडे यांचे मरणोत्तर नेत्रदान व देहदान शस्त्रक्रिया यशस्वी.

श्री. करडे यांनी समाजाप्रती आपण काही देणं लागतो हि भावना जपली ” मरावे परी नेत्र रुपी उरावे ” या भावनेतून त्यांनी मरणोत्तर नेत्रदान व देहदान करुन जमाजापूढे प्रेरणादायी एक आदर्श उभा केला आहे.उपजतचं अंगी असलेली दुरदृष्टी आणि सामाजिक बांधिलकी जपणे हे त्यांचे अंतिम ध्येय होते.
त्यांनी पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन आधुनिक शेतीची वाट चोखाळली आणि शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय जोडधंदा म्हणून जोपासला व फळबाग लागवड सुरू केली. द्राक्षबागेपासून प्रेरणा घेऊन त्यांनी कान्हेगाव येथे राहत्या घराजवळ बेदाण्याचा कारखाना उभारला, ज्यामध्ये पंचक्रोशीतल्या १०० हून अधिक कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. या उपक्रमामध्ये त्यांच्या बंधुनी त्यांना खंबीर साथ दिली.
त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार मरणोत्तर नेत्रदान व देहदान अवयवदान समुपदेशक डॉक्टर अशोक गावित्रे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे नेत्रदान श्री साईनाथ नेत्रपेढी साईबाबा संस्थान, शिर्डी येथे तर देहदान प्रवरा मेडिकल ट्रस्ट, लोणी येथे करण्यात आले
याप्रसंगी दिलीप करडे.संजय आसाराम करडे, मुली सुनीता गुंड संगीता सरोदे, बंधु भाऊसाहेब करडे, पांडुरंग करडे, रावसाहेब करडे, बाबासाहेब करडे. प्रकाशराव करडे, त्र्यंबकराव सरोदे, नामदेव जाधव, नवनाथ जाधव. दिनकर काजळे, बंडू पा. भाकरे, रमेश टेके, शांताराम जाधव, बापूसाहेब टिक्कल. LK चौधरी, राजूनाना, अशोक आप्पा, कैलास काजळे, प्रकाश काजळे, कान्हेगाव सरपंच गणेश सोनवणे उपस्थित होते
कै.करडे यांचे विचार,कार्य आणि मूल्ये ही पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरतील. मरावे परी नेत्ररूपी उरावे अशा शब्दात डॉ. अशोक गावित्रे यांनी शेवटी शब्दरूपी श्रद्धांजली अर्पण केली.