
कोपरगाव : – अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाघीनाला वस्ताद प्रतिष्ठान संवत्सर च्या वतीने त्यांच्या प्रतिमेस भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलचे कोपरगाव तालुकाध्यक्ष मुकुंद मामा काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना श्री. मुकुंद मामा काळे म्हणाले कि, माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या गावी जावुन त्यांचा फोटो मिळवून अर्धाकृती पुतळा तयार केला व कोपरगाव येथे सर्वप्रथम अर्धाकृती पुतळ्याची स्थापना केली आणि त्यानंतरच इतर ठिकाणी अनेक पुतळे उभे राहिले. अण्णाभाऊ साठे यांची परिस्थिती हालाखीची असल्याकारणाने त्यांचे शिक्षण जरी कमी झाले असले. तरी मात्र, आज सर्व शाळेत त्यांचे चरित्र अभ्यासायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे त्यांच्या ज्ञानाची दखल परदेशात देखील घेतली गेली होती. अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला दिशा दिली असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी वस्ताद प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघीनाला येथील ३० विद्यार्थ्यांना वही, पट्टी, पेन, पेन्सिल, रबर या शालेय शिक्षण साहित्याचे व अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावर आधारीत पुस्तकाचे वाटप करण्यात आले .
या कार्यक्रमास सौ. छायाताई मुकुंदमामा काळे, मंगलताई खरे, सोनालीताई खरे, मोनिकाताई पगारे, वनिताताई खरे, वस्ताद प्रतिष्ठान संवत्सर चे विशाल पगारे, राहुल खरे, प्रदीप खरे, रावसाहेब खरे, रामभाऊ खरे, महेफुज शेख, रंगनाथ पगारे, वैभव पगारे, कांतीलाल पगारे, कृष्णा पगारे, भानुदास खरे, दत्तात्रय खरे, साहिल बागुल, सुरज खरे, जीवन खरे, समाधान खरे, समरप्रीत खरे, दिगंबर खरे, कृष्णा खरे, श्रेयस पगारे, संदीप खरे, दिलीप खरे, बाळासाहेब बागुल, जनार्दन पगारे, विशाल खरे यांसह आदि महिला, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.